शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरीक्षेत्रात मासेमारी बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 18:06 IST

Fisherman Sindhudurg :  महाराष्ट्र सादरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत यंदाच्या वर्षी दि. 1 जून 2021 ते 31 जुलै 2021 या कालावधीत जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रामध्ये पावसाळी मासेमारी लागू करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग -मालवण यांनी कळविली आहे. 

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरीक्षेत्रात मासेमारी बंदीदि. 1 जून 2021 ते 31 जुलै 2021 या कालावधीत मासेमारी बंदी

सिंधुदुर्ग :  महाराष्ट्र सादरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत यंदाच्या वर्षी दि. 1 जून 2021 ते 31 जुलै 2021 या कालावधीत जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रामध्ये पावसाळी मासेमारी लागू करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग -मालवण यांनी कळविली आहे. या कालावधीत मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असले. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बिजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जनत होते. तसेच या काळात खराब वातावरण, वादळी हवामानामुळे मच्छिमारांचे होणारी जीवित व वित्त हानी टाळता येणे शक्य होते. या सर्व हेतून 1 जून ते 31 जुलै 2021 ( दोन्ही दिवस धरून ) सागरी क्षेत्रात ( सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे.सदर पावसाळी मासेमारी बंदी पुढील प्रमाणे असणार आहे. यांत्रिकी मासेमारी नौकांना लागू राहील, पारंपारिक पद्धतीने मसेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना ही बंदी लागू राहणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकांस केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण, मार्गदर्शक सूचना, आदेश लागू राहतील.

राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिकी मासेमारी नौकांस याकालावधीत मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी नियमन अधिनियम 1981, कलम 14 अन्वये असे गलबत जप्त करण्यात येऊन त्यात पकडलेली मासळी जप्त करण्यात येईल, तसेच कलम 17 मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लागण्यात येईल, बंदी कालावधीत ज्या मच्छीमार सहकारी संस्थांच्या यांत्रिक मासेमारी नौका मासेमारी करताना आढळतील, अशा संस्थांनी पुरस्कृत केलेले अर्ज रा.स.वि.नि. योजनेच्या लाभाकरिता विचारात घेतले जाणार नाहीत.

बंदी कालावधीत मासेमारी करताना यांत्रिक नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही. बंदी कालावधीमध्ये राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकेस अवागमन निषिद्ध असल्याचे अतुल पाटणे, आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी कळविले आहे. 

टॅग्स :Fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग