शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

मच्छिमारांचे उपोषण

By admin | Updated: October 30, 2015 23:13 IST

आक्रमक : पर्ससीनवर कारवाईची मागणी

आचरा : गेली सहा वर्षे आचरा बंदरातील अनधिकृत पर्ससीनवर कारवाई करण्याची मागणी करून हतबल झालेल्या पारंपरिक मच्छिमारांनी भर समुद्रात शुक्रवारी सकाळपासून उपोषण सुरु केले व पारंपरिक महिला मच्छिमारांनी आचरा जेटीवर धरणे आंदोलन छेडले. यावेळी मालवण, तळाशिल, आडबंदर, मुणगे या भागातील पारंपरिक मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला पारंपरिक मच्छिमारांनी आपल्या होड्या खोल समुद्रात नांगरून उपोषणास सुरुवात केली होती. दरम्यान, सायंकाळी मालवणच्या तहसीलदार वनिता पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत पर्ससीननेट धारकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यामुळे हे उपोषण आठ दिवसांसाठी स्थगित करण्यात आले. समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने आचरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे व आचरा सरपंच मंगेश टेमकर यांनी मच्छिमारांशी संपर्क करून आचरा खाडीत आपल्या होड्या हलवाव्यात अशी विनंती केल्याने पारंपरिक मच्छिमारांनी होड्या खाडीत आणून उपोषण चालू ठेवले. यावेळी मच्छिमार नेते छोटू सावजी, रविकिरण तोरसकर, धर्माजी आडकर, बाबी जोगी, दिलीप घारे, संजय केळुसकर, नारायण कुबल, विष्णू कुबल, वासुदेव कमळे, गौरी सारंग, सिमाली चोपडेकर, वसुंधरा कमळे आदी २०० हून जास्त महिलाही सहभागी होत्या. अस्तित्वासाठी निर्वाणीचा लढा पर्ससीन मासेमारीमुळे पारंपरिक मच्छिमार मासेमारीसाठी गेले असता समुद्रातून रिकाम्या हाताने माघारी फिरण्याची वेळ आली आहे. पारंपरिक मच्छिमार जिवंत ठेवण्यासाठी त्याचे अस्तित्व शिल्लक राहण्यासाठी हा निर्वाणीचा लढा आहे. जोपर्यंत पर्ससीनवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा पारंपरिक मच्छिमारांनी उपोषणावेळी निर्धार केला. आचरा बंदरातील प्रत्येक पारंपरिक मच्छिमार आपली होडी घेऊन उपोषणास बसले होते. मात्र, सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले. (वार्ताहर)