सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांना गेल्या १५ महिन्यांची डिझेल सबसिडी (परतावा) मिळालेली नाही. त्यामुळे जिल्ह््यातील मच्छिमार मेटाकुटीस आलेला आहे. डिझेल सबसिडीची २ कोटी एवढी रक्कम मत्स्यव्यवसाय विभागाकडे उपलब्ध असून देखील याकडे डोळेझाक केली जात आहे. ही सबसिडीची रक्कम येत्या आठ दिवसांत वाटप न केल्यास मत्स्यव्यवसाय विभाग कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मच्छिमार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. प्रसंगी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन छेडू असेही संघटनेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खवळे यांनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांना गेल्या पंधरा महिन्यांची डिझेल सबसिडी न मिळाल्याने आक्रमक झालेल्या मच्छिमार बांधवांनी जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी कृष्णनाथ तांडेल, राजेंद्र कुबल, अशोक सावंत, सभापती जेरॉन फर्नाडिस,उमेश खवळे, देवीदास कुबल, विष्णू कांदळगांवकर, सुनिल सावंत, बाबी रेडकर, गणपत चोडणकर, गुंडू खोबरेकर, विठोबा लोणे, पांडुरंग मालंडकर आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णयाप्रमाणे डिझेल सबसिडी परतावा महिन्याचा कालावधी संपल्या नंतर आठ दिवसात सबसिडी देण्याची तरतूद केलेली असतानाही गेले १५ महिने सबसिडी वाचून मच्छिमार वंचित राहिले आहेत. त्यामुळे मच्छिमारांची शासन, सरकारी सोसायट्या, बॅका यांची कर्जे देणे बाकी राहिली आहेत. यातच गेली दोन वर्षे मच्छिमारांना मासेमारी दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे सर्व मच्छिमार मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे मच्छिमारांचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो....तर आंदोलन करणारशासनाकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडे २ कोटी रुपये एवढा सबसिडी परतावा आलेला आहे. मात्र त्याचे अद्याप वाटप करण्यात आलेले नाही. येत्या आठ दिवसांत सबसिडीची रक्कम मिळाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.29012019-ङंल्ल‘-11थकीत डिझेल परतावा रक्कम मिळावी या मागणीसाठी मंगळवारी जिल्हयातील मच्छिमार बांधवांनी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी मच्छिमार उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खवळे, सभापती जेरॉन फर्नाडिस, अशोक सावंत यांच्यासह अन्य मच्छिमार उपस्थित होते.
मच्छिमार संघटना रास्ता रोको करणार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 16:22 IST
सबसिडीची रक्कम येत्या आठ दिवसांत वाटप न केल्यास मत्स्यव्यवसाय विभाग कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मच्छिमार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. प्रसंगी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन छेडू असेही संघटनेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खवळे यांनी सांगितले.
मच्छिमार संघटना रास्ता रोको करणार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून इशारा
ठळक मुद्दे मच्छिमार संघटना रास्ता रोको करणार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून इशारा१५ महिन्यांची डिझेल सबसिडी त्वरीत द्यावी