शहरं
Join us  
Trending Stories
1
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
2
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
3
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले- "आता पर्याय...'
4
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
5
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
6
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
7
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
8
रेल्वे तिकीट बुकिंगवर परिणाम दिसू लागला! बराच वेळ झाला तरी तत्काळ तिकीटे उपलब्ध होती...
9
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
10
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...
11
प्रेमासाठी बदललं जेंडर, पती निघाला फ्रॉड, पैसे-प्रॉपर्टीचा होता लालची, ट्रांसजेंडर अभिनेत्रीचा खुलासा
12
कळव्यातील महिलेच्या हत्येचं कोडं सुटलं, ४० हजार...; बिहारमधून दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचाही समावेश
13
विरोधकांनी शेतकरी प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये, चर्चा करण्यास केव्हाही तयार: अजित पवार
14
चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण
15
आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र
16
विक्री घटली! जूनमध्ये टाटा, मारुती, ह्युंदाईच्या गोटात हाहाकार उडाला; महिंद्रा, एमजीने झेंडा रोवला...
17
पुढील शंभर वर्षांचा विचार करून नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करा; DCM अजित पवारांचे निर्देश
18
धक्कादायक! गर्लफ्रेंडने भेटायला बोलवलं अन् बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्टच कापला; कशावरून झाला वाद?
19
तरुण-तरुणी तर्राट, स्कॉर्पियो सुसाट, रस्ता सोडून थेट घरात घुसली गाडी
20
लिस्ट होताच गुंतवणूकदारांकडून शेअरची विक्री; पहिल्याच दिवशी केलं मोठं नुकसान, ₹६९ वर आली किंमत

भाजपच्या मतावर जिंकलेल्या खासदारकीचा प्रथम राजीनामा द्या ! -- प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 15:56 IST

तारीख पे तारीख ' देणार्‍या खासदार संजय राऊत याना आमचे जाहीर आव्हान आहे. संजय राऊत हे सातत्याने भाजपाबाबत जेवढे वाईट बोलता येईल तेवढे बोलत आहेत. एवढी भाजप वाईट होती, अस्पृश्य होती, भाजपापासुन एवढा धोका होता तर भाजपाबरोबर महायुतीच्या भानगडीत का पडलात ?

ठळक मुद्देशिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी सरकार म्हणजे तीन पैशाचा तमाशा!

कणकवली : शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन पक्षांचे सरकार म्हणजे ' तिन पायांची शर्यत , तीन पैशाचा तमाशा ' होणार आहे. महायुतीच्या नावाखाली रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणुक लढवायची आणि भाजपच्या दोन लाख मतांच्या जोरावर विजयी व्हायचे आणि आता भाजपवर टीका करायची हे बरे नव्हे. एवढेच भाजप जर तुम्हाला नकोसे वाटत असेल तर प्रथम भाजपच्या जिवावर विजयी झालेल्या खासदारकीचा राजीनामा द्या. त्यानंतर टीका करा आणि निवडणुक लढवुन पुन्हा निवडुन येऊन दाखवा असे खुले आव्हान भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यानी खासदार विनायक राऊत यांना दिले आहे.कणकवली येथील भाजपाच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत वाहतुक संघटना जिल्हाध्यक्ष शिशीर परुळेकर, सुरेश सावंत उपस्थित होते.यावेळी प्रमोद जठार म्हणाले, ' तारीख पे तारीख ' देणार्‍या खासदार संजय राऊत याना आमचे जाहीर आव्हान आहे. संजय राऊत हे सातत्याने भाजपाबाबत जेवढे वाईट बोलता येईल तेवढे बोलत आहेत. एवढी भाजप वाईट होती, अस्पृश्य होती, भाजपापासुन एवढा धोका होता तर भाजपाबरोबर महायुतीच्या भानगडीत का पडलात ? असा सवाल करतानाच जठार म्हणाले, लोकसभा निवडणुक लढताना महायुतीची गरज होती . मात्र, राष्ट्रवादी व काँग्रेसबरोबर जाऊन मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळेल असे जेव्हा तुम्हाला वाटले , तेव्हा युती नकोशी झाली. असे का ?शिवसेनेच्या महाराष्ट्रातील खासदारानी राजीनामे द्यावे व भाजपशिवाय निवडुन येऊन दाखवावे. हे खासदार संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत यांना आमचे आव्हान आहे. भाजपबाबत एवढी नाक मुरडता मग तुम्हाला भाजपच्या जीवावर मिळालेली खासदारकी कशी चालते ? महाराष्ट्रात तुम्ही सत्ता स्थापन करा. तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत . परंतु हे सरकार तीन वर्षे तरी टिकेल का ? याचा विचार करा.खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना एवढ्यावेळा भेटले आहेत की, जेवढी भेट खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची झाली नसेल. याचाच अर्थ शिवसेना सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जावू शकते असा होतो . शिवसेनेचे ६३ आमदार आज घाबरलेल्या स्थितीत आहेत. शिवसेना आमदारांचे म्हणणे आहे कि, आम्हाला काँग्रेस,राष्ट्रवादीच्या दावणीला बांधु नका. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे आपल्या भवितव्याची काळजी करत आहेत. मात्र आमच्या भवितव्याचे काय ? असा साधासोपा प्रश्न या आमदारांना पडला असल्याचे प्रमोद जठार यानी यावेळी सांगितले.'पोटात एक आणि बाहेर एक' असे का?शिवसेनेने खासदार अरविंद सावंत यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्यानंतर शिवसेना विरोधी बाकावर बसणार हे निश्चित झाले. मग खासदारांची सभागृहात बसण्याची जागा बदलण्यात आली यात काय चुकले ? त्याविषयावरून भाजपवर टीका करणाऱ्यांनीशिवसेनेच्या ' पोटात एक आणि बाहेर एक' अशी भूमिका का? याचे उत्तर द्यावे . असेही प्रमोद जठार यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूरBJPभाजपा