शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

लांब पल्ल्याची पहिली एसटी बस धावली, तब्बल पावणेतीन महिन्यांनंतर सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:04 IST

सावंतवाडी एसटी आगारातून तब्बल पावणेतीन महिन्यांनंतर पुणे-निगडी ही राज्यांतर्गत लांब पल्ल्याची पहिली एसटी बस २२ प्रवाशांना घेऊन रवाना झाली. या बससाठी प्रवाशांनी ग्रुप बुकिंग केले होते.

ठळक मुद्दे लांब पल्ल्याची पहिली एसटी बस धावली तब्बल पावणेतीन महिन्यांनंतर सुरुवात

सावंतवाडी : सावंतवाडी एसटी आगारातून तब्बल पावणेतीन महिन्यांनंतर पुणे-निगडी ही राज्यांतर्गत लांब पल्ल्याची पहिली एसटी बस २२ प्रवाशांना घेऊन रवाना झाली. या बससाठी प्रवाशांनी ग्रुप बुकिंग केले होते.लॉकडाऊन काळात पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली होती. एसटी महामंडळाच्या सावंतवाडी आगारातून ही गैरसोय दूर कण्यासाठी पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांना गु्रप बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या प्रवासासाठी २२ प्रवाशांची संख्या असणे आवश्यक होते.प्रासंगिक कराराअंतर्गत ही बस सेवा सुरू करण्यात आली असून वैद्यकीय दाखला व आधारकार्ड त्यासाठी आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजता ही बस पुणे-निगडी येथे रवाना झाली.यावेळी आगार व्यवस्थापक मोहनदास खराडे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक वैभव पडोळे, अरुण पवार, रामचंद्र वाडकर, ए. व्ही. राणे, एम. बी. नानचे, बसचालक रामदास कोलगावकर, बापू कदम व प्रवासी उपस्थित होते. प्रवाशांना आगरातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

या गु्रप बुकिंगला मिळालेला प्रतिसाद पाहून पुणे येथे ही फेरी सोडण्यात येणार आहे. ज्या प्रवाशांना प्रवास करावयाचा आहे त्यांनी सावंतवाडी आगारात नावे नोंदवावीत, असे आवाहन आगार व्यवस्थापक खराडे यांनी केले आहे.प्रासंगिक करारांतर्गत सेवालॉकडाऊन काळात एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाअंतर्गत काही एसटी फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, कोल्हापूर, मुंबई, पुणे या लांब पल्ल्याच्या एसटी बसेस बंद होत्या. प्रासंगिक करार या योजनेंतर्गत ही सेवा असून तसे भाडे आकारले जात आहे. प्रवास करणाºया प्रवाशांना त्यांचा वैद्यकीय दाखला व आधारकार्ड देणे बंधनकारक केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग