शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

बागवाडीत सुरूच्या बनाला आग : दोन दिवसांनी आग आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 16:53 IST

कुणकेश्वर : मिठमुंबरी बागवाडी येथील सुरुच्या बनाला अचानक लागलेल्या आगीचा भडका अखेर दोन दिवसानंतर आटोक्यात आणण्यात आला. यामुळे सामाजिक ...

ठळक मुद्दे सामाजिक वनीकरणाचे मोठे नुकसान

कुणकेश्वर : मिठमुंबरी बागवाडी येथील सुरुच्या बनाला अचानक लागलेल्या आगीचा भडका अखेर दोन दिवसानंतर आटोक्यात आणण्यात आला. यामुळे सामाजिक वनीकरणाच्यावतीने लागवड करण्यात आलेल्या सुरुच्या बनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिठमुंबरी बागवाडी येथील वस्तीपासुन काही अंतरावर असणाºया खासगी जागेत सामाजिक वनीकरण विभागाने सुरुची व अन्य झाडांची लागवड केली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास त्या ठिकाणी धुरांचे लोळ तेथील स्थानिकांना हवेत दिसू लागल्याने ग्रामस्थांनी पाहणी केली असता सुरुच्या बनातील आतील भागात आग लागल्याचे दिसून आले.

यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ देवगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून महाकाय आगीची माहिती दिली.यावरुन देवगड पोलिसांनी आग आटोक्यात आणण्यासाठी कणकवली अग्निशमन दलाची बंबगाडी मागविण्यात आली. मात्र, बंबगाडीच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यास बुधवारी रात्रीपर्यंत प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, सोसाट्यचा वारा असल्यामुळे आग आटोक्यात येणे अशक्य होत होते.

अखेर गुरुवारीही सकाळपासूनच आगीचे तांडव दिसतच होते.  अखेर गुरुवारी दुपारनंतर ही आग आटोक्यात आल्याचे सांगण्यात आले. या आगीमुळे सुरुच्या बनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचा पंचनामा महसूल विभागाच्यावतीने करण्यात आला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकण