सिंधुदुर्ग : वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 45 हजार 137 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.यामध्ये एकूण 9 हजार 592 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 677 जणांनी दुसरा डोस घेतला. 8 हजार 58 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 4 हजार 239 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 63 हजार 804 व्यक्तींनी पहिला डोस तर 21 हजार 804 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 51 हजार 231 नागरिकांनी पहिला डोस तर 6 हजार 194 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 12 हजार 452 जणांनी पहिला डोस घेतला आहे. असे एकूण 1 लाख 84 हजार 51 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 1 लाख 81 हजार 390 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1 लाख 40 हजार 780 लसी या कोविशिल्डच्या तर 40 हजार 610 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 1 लाख 44 हजार 480 कोविशिल्ड आणि 39 हजार 571 कोवॅक्सिन असे मिळून 1 लाख 84 हजार 51 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 3 हजार 680 लसी असून त्यापैकी 3 हजार 270 कोविशिल्डच्या तर 410 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 1 हजार 920 लसी शिल्लक असून त्यामध्ये कोविशिल्डच्या 1 हजार 840 लसी आणि कोवॅक्सीनच्या 80 लसी शिल्लक आहेत.
Corona vaccine In Sindhudurg : जिल्ह्यात 1 लाख 45 हजार जणांनी घेतला पहिला डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 18:05 IST
Corona vaccine In Sindhudurg : वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 45 हजार 137 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
Corona vaccine In Sindhudurg : जिल्ह्यात 1 लाख 45 हजार जणांनी घेतला पहिला डोस
ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 लाख 45 हजार जणांनी घेतला पहिला डोसकोविशिल्डच्या 1 हजार 840 लसी आणि कोवॅक्सीनच्या 80 लसी शिल्लक