शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गवासियांसाठी शुभवार्ता!, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिली बायपास शस्त्रक्रिया यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 12:57 IST

आपले हॉस्पिटल हा धंदा नाही. या जिल्ह्यात दर्जेदार रुग्णसेवा मिळावी हे आपले स्वप्न होते. त्या स्वप्नांची पूर्तता आता होत आहे आणि त्याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे असे भावनिक उद्गारही नामदार राणे यांनी यावेळी बोलताना काढले.

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच बायपास शस्त्रक्रियेची सोय झाली आणि श्री अमित शंकर परब या चाळीस वर्षीय रुग्णावर पडवे येथिल लाइफटाइम हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजमधे पहिलीच शस्त्रक्रिया यशस्वी झाली. हा क्षण जिल्ह्याच्या आणि लाईफटाईम हॉस्पिटलच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे. अशी माहिती पहिल्याच यशस्वी शस्त्रक्रियेनंतर केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या जिल्ह्यात आरोग्यविषयक परिपूर्ण सेवा देण्याचे आपले स्वप्न पूर्णत्वास गेले त्याबद्दलचा आनंदही त्याने व्यक्त केला. यावेळी लाईफटाईम हॉस्पिटलच्या अध्यक्षा सौ नीलम ताई राणे व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात परिपूर्ण आरोग्यसेवा व्हावी या दृष्टीने आपले स्वप्न या जिल्ह्यातील या पहिल्याच बायपास शस्त्रक्रियेने पूर्णत्वास जात आहे. त्याचा आपल्याला मनस्वी आनंद असून या जिल्ह्यात चांगले व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी म्हणून पडवे येथील लाईफ टाईम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मध्ये ही बायपास शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.मुंबई, कोल्हापूर, पुणे, गोवा आदी शहरांत बायपास शस्त्रक्रियेच्या रुग्णांना हलविले जात होते. मात्र आमच्या या रुग्णालयात ही बायपास शस्त्रक्रिया सुविधा सुरू झाली आहे. हे जाहीर करण्यासाठी व या शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांचे अभिनंदन करण्यासाठी हा कार्यक्रम झाला. यावेळी बायपास शस्त्रक्रिया यांचे तज्ज्ञ सर्जन डॉ अमृत नेरर्लोकर डाँ विनायक माळी या बायपास शस्त्रक्रिया करणार्‍या तज्ज्ञ डॉक्टरांचा सत्कार नामदार नारायण राणे यांनी केला. व त्यांचे कौतुकही केले. या बायपास शस्त्रक्रियेसाठी व या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आसावरी उपाध्याय यांनी परिश्रम घेतले असून त्यांचेही नामदार राणे यांनी कौतुक केले.आपले हॉस्पिटल हा धंदा नाही. या जिल्ह्यात दर्जेदार रुग्णसेवा मिळावी हे आपले स्वप्न होते. त्या स्वप्नांची पूर्तता आता होत आहे आणि त्याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे असे भावनिक उद्गारही नामदार राणे यांनी यावेळी बोलताना काढले. जिल्हा व शहर जनतेचे ऋण फेडण्यासाठी या जिल्ह्यात आपण हा प्रोजेक्ट राबविला व आता बायपाससारखी शस्त्रक्रिया होऊन हॉस्पिटल प्रोजेक् पूर्णत्वाकडे गेला याबद्दलचे आपल्याला समाधान आहे. मी आणि माझ्या विरोधातील विरोधी नेते यामधे मोठा फरक आहे. या जिल्ह्यात शैक्षणिक सुविधेसाठी शाळा, कॉलेज, इंजिनीअरींग कॉलेज मेडिकल कॉलेज अशा विविध शैक्षणिक सुविधांची सोय या जिल्ह्यांत व्हावी म्हणून मी पुढाकार घेतला आहे व तो पूर्णत्वाकडे नेला आहे , असेही राणे यांनी स्पष्ट केले.दर्जेदार रुग्णसेवालाईफटाईम हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर्स नर्सेस अन्य सर्व कर्मचारी या सर्वांसाठीच हा ऐतिहासिक व आनंदाचा दिवस आहे. व या बायपास शस्त्रक्रियेच्या निमित्ताने या हॉस्पिटलमधील डॉक्टर क्टर्स व अन्य कर्मचाऱ्यांना स्फूर्ती मिळेल या रुग्णालयातून येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार रुग्णसेवा मिळेल अशी ग्वाही नामदार नारायण राणे यांनी दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhospitalहॉस्पिटल