शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

फटाके वाजवणे,नरकासुर प्रतिमा दहन यावर नियंत्रण गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 10:52 IST

coronavirus, diwali, crackersban, sindhudurg सध्या कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. मात्र, कोरोना पूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे यावर्षी दिवाळीच्या कालावधीत फटाके वाजविणे तसेच नरकासुर प्रतिमा दहन करणे अशा विविध माध्यमातून वायूप्रदूषण होणार नाही, याकडे नागरिकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर समूह संसर्ग वाढू नये यासाठी गर्दीही टाळणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोना संसर्गाचा धोका आणखीनच वाढू शकतो.

ठळक मुद्दे कोरोनाच्या काळात वायूप्रदूषण टाळणे आवश्यक ! नागरिकांनी करावे स्वयंशिस्तीचे पालन

सुधीर राणेकणकवली : सध्या कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. मात्र, कोरोना पूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे यावर्षी दिवाळीच्या कालावधीत फटाके वाजविणे तसेच नरकासुर प्रतिमा दहन करणे अशा विविध माध्यमातून वायूप्रदूषण होणार नाही, याकडे नागरिकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर समूह संसर्ग वाढू नये यासाठी गर्दीही टाळणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोना संसर्गाचा धोका आणखीनच वाढू शकतो.शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासामध्ये कोविड -१९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या जगभरातील एकूण रुग्णांपैकी १५ टक्के रुग्ण वायूप्रदूषणाच्या संसर्गामुळे मृत्यू पावल्याचे समोर आले आहे. फटाक्यांमुळे होणाऱ्या वायूप्रदूषणाचा परिणाम लक्षात घेऊन सणांच्या कालावधीत फटाके फोडण्यावर शासनाकडून काही प्रतिबंध घालण्यात आले आहेत . त्याचे नागरिकांनी पालन करणे गरजेचे आहे.त्याचबरोबर नरकासुर प्रतिमांच्या दहनामुळेही वायुप्रदूषण होते. याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नरकासुराच्या मोठमोठ्या प्रतिमा कोरडा गवताचा पेंडा , कागद , पुठ्ठा ,लाकूड , प्लास्टिक आदी वस्तूंपासून बनवलेल्या असतात . त्या जाळल्याने कार्बन मोनोक्साईड , हायड्रोकार्बन यांची निर्मिती होते.त्यामुळे वायूप्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते . याचा मनुष्याच्या आरोग्यावर गंभीर स्वरूपाचा परिणाम होतो . कोरोना महामारी पसरलेली असतांनाही नरकासुराच्या प्रतिमा बनवून त्या जाळणे व फटाके फोडणे याविषयी काळजी घेणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमांच्यावेळी उत्साहाच्याभरात होणारी गर्दीही धोकादायक ठरू शकते.सध्या थँडीचे प्रमाण वाढले असून रात्रीच्या वेळी धुके पडते आणि तापमान अल्प होते . त्यामुळे हवेतील प्रदूषित घटक भूमीजवळ खेचले जातात . हे विषारी घटक आपल्या श्वासोच्छ्वासाच्या संपर्कात येतात . हे प्रदूषित घटक श्वसनक्रियेच्या माध्यमातून आपल्या शरिरात जातात आणि आपल्याला अपायकारक ठरतात . कोरोना महामारीपासून रक्षण करण्यासाठी सध्या आपल्याला शुद्ध हवेची नितांत आवश्यकता आहे . अशा धोकादायक परिस्थितीत नरकासुर प्रतिमादहनासारखे कार्यक्रम करणे घातक ठरू शकते. असे वैद्यकीय तज्ञाचे म्हणणे आहे. त्याचा सजग नागरिकांनी विचार करणे आवश्यक आहे.

प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी !कोरोनाच्या कालावधीत वायूप्रदूषण वाढू नये यासाठी स्वयंशिस्तीचे पालन आवश्यक आहे. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नये यासाठी प्रयत्न महत्वाचे आहेत. कोरोनाच्या कालावधीत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून स्वतः बरोबरच इतरांच्याही आरोग्याची काळजीही प्रत्येकाने घ्यावी. दमा तसेच इतर श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींना वायूप्रदूषणामुळे आणखीनच त्रासहोऊ शकतो.- डॉ.कुबेर मिठारी .तालुका आरोग्य अधिकारी, मालवण.

टॅग्स :Crackers Banफटाके बंदीsindhudurgसिंधुदुर्गDiwaliदिवाळी