सावंतवाडी : तेरेखोल नदीपात्रात हत्ती आंघोळ करत असताना त्याच्यावर सुतळी बॉम्ब फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पर्यावरण प्रेमीत तीव्र संतापाची लाट उसळली. यावर वनविभागाकडून खुलासा करण्यात आला असून हा प्रकार हत्तीला त्रास द्यायचा नसून हत्ती नदीतील विद्युत मोटरपंप सोंडेने ओढत असल्याने त्याला रोखण्यासाठीच फटाके फोडण्यात आल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले. तसे केले नसते तर हत्तीला विजेचा धक्का लागला असता असेही वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.सध्या हत्ती सावंतवाडी तालुक्यातील बांदा परिसरात असून तो फळबागेत, शेतात वावरताना दिसतो. २ नोव्हेबर रोजी इन्सुली परिसरात भात शेती तसेच केळी बागायतीचे नुकसान करुन तेरेखोल नदीपात्रातून किनारी आला होता. येथे सुर्यकांत महादेव दळवी याच्या मालकीच्या विद्युत मोटरपंपाचा पाईप सोंडेने ओढत असल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे मोटर विदयुत उपकरणासह पाण्यात पडण्याची शक्यता होती. त्यामुळे ओंकार हत्तीस जिवीतहानी होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
वाचा - नदीत आंघोळ करताना हत्तीवर फटाके-सुतळी बॉम्ब फेकले; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील प्रकार यामुळे कोणतीही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पाण्यात हत्ती पासून काही अंतरावर फटाके वाजविणेत आल्याचा खुलासा वनविभागाकडून करण्यात आला आहे. यात हत्तीला इजा किंवा हानी होणार नाही याची दक्षता घेत असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.अपवादात्माक परिस्थितीत फटाक्याचा वापर हत्तीला कोणतीही हानी होणार नाही याकरीता अपवादात्माक परिस्थितीत वनविभागाव्दारे फटाक्यांचा वापर करण्यात येत असतो. त्यामुळे नागरिकांना हत्तीचा वावर असलेल्या भागात हत्ती पाहण्यासाठी गर्दी करु नये तसेच वन्यहत्तीस कोणत्या ही प्रकारची इजा होईल अशा प्रकारचे कृत्य करु नये असेही वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.
Web Summary : After a video surfaced of firecrackers thrown at an elephant bathing in a river in Sindhudurg, the Forest Department clarified they were used to prevent the elephant from damaging a water pump and potentially electrocuting itself. The elephant had been causing damage to farms in the area.
Web Summary : सिंधुदुर्ग में नदी में नहाते हाथी पर पटाखे फेंकने का वीडियो सामने आने के बाद, वन विभाग ने स्पष्ट किया कि पटाखे हाथी को पानी के पंप को नुकसान पहुंचाने और संभावित रूप से खुद को बिजली का झटका लगने से बचाने के लिए फेंके गए थे। हाथी इलाके में खेतों को नुकसान पहुंचा रहा था।