शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्ल्यात आंबा, काजू कलमांना आग, सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 11:38 IST

वडखोल-परबवाडी येथील प्रज्ञा पांडुरंग परब यांच्या गवताच्या गंजीला तसेच आंबा व काजू कलमांना आग लागून सुमारे १ लाखाचे नुकसान झाले आहे. या आगीचे कारण या बागेतून जाणाऱ्या वीज वाहिन्यांच्या घर्षणाने असल्याने वीज वितरण कंपनीकडे या संदर्भात एक महिन्यापूर्वी लेखी तक्रार करूनही वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी या संदर्भात दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली आहे.

ठळक मुद्दे वेंगुर्ल्यात आंबा, काजू कलमांना आग, सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान विद्युत वाहिन्यांच्या घर्षणाने घडला प्रकार

वेंगुर्ला : वडखोल-परबवाडी येथील प्रज्ञा पांडुरंग परब यांच्या गवताच्या गंजीला तसेच आंबा व काजू कलमांना आग लागून सुमारे १ लाखाचे नुकसान झाले आहे. या आगीचे कारण या बागेतून जाणाऱ्या वीज वाहिन्यांच्या घर्षणाने असल्याने वीज वितरण कंपनीकडे या संदर्भात एक महिन्यापूर्वी लेखी तक्रार करूनही वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी या संदर्भात दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली आहे.वडखोल-परबवाडी येथे रविवारी दुपारी १२.३० च्या दरम्यान शॉर्टसर्किट होऊन येथील प्रज्ञा परब यांच्या आंबा व काजू बागेला आग लागली. ही आग पुढे पुढे जात तेथील असणाऱ्या गवताच्या गंजीला लागली. या आगीत सुमारे ६ हजारांपेक्षा अधिक गवताच्या पेंढ्या जळून खाक झाल्या. तसेच आंबा व काजू कलमे आगीत होरपळून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.ही घटना समजताच येथील प्रज्ञा परब, गोपीचंद परब, मुकुंद परब, राजाराम राणे, भास्कर परब, बाबाजी परब, मंगेश परब, नारायण परब, प्रदीप परब, किरण परब, सुशांत राणे, गौरव राणे, काशी परब, गजानन परब, अर्पिता परब, रविना राणे यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.मात्र, ही आग गवताच्या गंजीला लागल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले. दरम्यान, घटनास्थळी वेंगुर्ला नगरपरिषदेचा बंब दाखल झाला. यावेळी बंबावर कार्यरत असलेले सागर चौधरी, लक्ष्मण जाधव, गौरव आरेकर, किरण जाधव, निलेश जाधव, सनातन धमानिया, पंकज पाटणकर यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.वेंगुर्ला कार्यालयाचे अधिकारी चव्हाण यांना माहिती समजताच त्यांनी घटनेची पाहणी करून पंचनामा केला. तत्काळ येथील वीज वाहिन्यांचे काम हाती घेण्यात आले. यावेळी प्रज्ञा परब यांनी मेहनत घेऊन काढलेली गवताची गंजी पूर्णत: जळून खाक झाल्याने व ऐन आंबा, काजू हंगामात आंबा व काजू कलमे होरपळून गेल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग