शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत बंद फ्लॅटमध्ये आग, स्टेशनरी साहित्य जळून खाक! चोवीस लाखांचे नुकसान

By सुधीर राणे | Updated: March 28, 2023 15:25 IST

नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाने ही आग आटोक्यात आणली.

कणकवली: कणकवली तेलीआळी येथील पाताडे कॉम्प्लेक्स मधील अष्टविनायक अपार्टमेंटच्या तळमजल्यामधील एका फ्लॅटमध्ये अचानक आग लागली. या आगीत स्टेशनरी साहित्य, कपडे तसेच अन्य वस्तू जळून खाक झाल्या. आगीत एकूण २४ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाने ही आग आटोक्यात आणली.तेलीआळी येथील पाताडे कॉम्प्लेक्समधील अष्टविनायक अपार्टमेंटच्या तळमजल्यावर नारायण सीताराम मयेकर यांनी भाड्याने फ्लॅट घेतला होता. त्यांच्यासह शरद सीताराम मयेकर, मोहन सीताराम मयेकर व दत्तप्रसाद राघो कोरगावकर अशा चौघांनी  आपल्या व्यवसायासाठीचे साहित्य त्या फ्लॅटमध्ये ठेवले होते. काल, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास फ्लॅटमध्ये अचानक आग लागली.

पहाटेच्या सुमारास फ्लॅटमधून धूर येत असल्याचे दिसताच नागरिकांनी मयेकर यांना माहिती दिली. तसेच काही नागरिकांनी कणकवली नगरपंचायतीचा अग्नीशामक दलास माहिती दिली. माहिती मिळताच अग्नीशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल होत जवानांनी आग आटोक्यात आणली.या आगीत नारायण मयेकर यांच्या स्टेशनरी वस्तूचे २ लाख ५० हजार रुपये, शरद मयेकर यांचे रेडिमेड कपडे व  व्यापाराच्या वस्तूचे ७ लाख रुपये, मोहन  मयेकर यांचे ३ लाख रुपये, दत्तप्रसाद कोरगावकर यांचे कापड व्यापाराच्या वस्तूचे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआग