शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

ओसरगावात लाकडाच्या डेपोला आग, लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 15:08 IST

महामार्गालगत ओसरगाव येथे असलेल्या महामार्ग ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉनच्या लाकडाच्या डेपोला आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देओसरगावात लाकडाच्या डेपोला आग, लाखो रुपयांचे नुकसान दिलीप बिल्डकॉनकडून लाकडाचा साठा

कणकवली : महामार्गालगत ओसरगाव येथे असलेल्या महामार्ग ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉनच्या लाकडाच्या डेपोला आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.सध्या कणकवली तसेच कुडाळ तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या चौपदरीकरण कामादरम्यान महामार्गाच्या दुतर्फा असलेली आंबा, साग अशी विविध प्रकारची झाडे तोडण्यात आली आहेत. त्या झाडांचे ओंडके दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीने एकत्र करून ओसरगाव येथे महामार्गालगत रचून ठेवले होते. या लाकडांच्या डेपोला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की सुमारे तीन एकर परिसरात रचून ठेवलेले लाकडाचे ओंडके जळून खाक झाले आहेत.मंगळवारी दिलीप बिल्डकॉनच्या काही कामगारांची सुटी होती. त्यामुळे थोडेच कामगार उपस्थित होते. या आगीची माहिती समजताच कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याला यश आले नाही. कणकवली नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबालाही पाचारण करण्यात आले. त्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले.मात्र, मोठ्या प्रमाणात लाकडाचे ओंडके जळून खाक झाले आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, त्याबाबतचा नेमका आकडा समजू शकला नाही. या घटनेबाबत दिलीप बिल्डकॉनचे कार्यकारी अधिकारी लवकुश मुन्नीलाल विश्वकर्मा (२६, सध्या रा. ओसरगाव) याने कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. मात्र, या घटनेप्रकरणी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.यापूर्वीही लागली होती आगयापूर्वीही ओसरगाव येथील दिलीप बिल्डकॉनच्या बेस कॅम्पमध्ये आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळच्या आठवणी या घटनेमुळे जाग्या झाल्या. मंगळवारी लागलेल्या आगीमुळे वीज वितरणचेही नुकसान झाले आहे.

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग