शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नानेली येथे मध्यरात्री घरात अग्नितांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 19:59 IST

Fire Sindhudurg- नानेली सुतारवाडी येथील ज्ञानेश्वर भिकाजी खरूडे यांच्या घराला पहाटे ३.३० च्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी या घरात खरूडे व त्यांची पत्नी गाढ झोपेत होते. मात्र, त्यांच्या घराशेजारीच राहणार्‍या भावाच्या पत्नीने आग लागल्याचे पाहिले व घरात जात या दोघांनाही उठविले. मध्यरात्री घरात घडलेल्या या अग्नितांडवात सुलोचना खरूडे यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. यामुळे गाढ झोपेत असलेल्या दोघांचे प्राण वाचले.

ठळक मुद्देनानेली येथे मध्यरात्री घरात अग्नितांडव सुलोचना खरूडे यांची सतर्कता; अनर्थ टळला

माणगांव : नानेली सुतारवाडी येथील ज्ञानेश्वर भिकाजी खरूडे यांच्या घराला पहाटे ३.३० च्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी या घरात खरूडे व त्यांची पत्नी गाढ झोपेत होते. मात्र, त्यांच्या घराशेजारीच राहणार्‍या भावाच्या पत्नीने आग लागल्याचे पाहिले व घरात जात या दोघांनाही उठविले. मध्यरात्री घरात घडलेल्या या अग्नितांडवात सुलोचना खरूडे यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. यामुळे गाढ झोपेत असलेल्या दोघांचे प्राण वाचले.नानेली सुतारवाडी येथील ज्ञानेश्वर भिकाजी खरूडे यांच्या शेजारी राहणार्‍या भावाची पत्नी सुलोचना रमेश खरूडे या पहाटे ३.३० च्या सुमारास बाहेर आल्या होत्या. यावेळी ज्ञानेश्वर यांच्या घराच्या पडवीत त्यांना आगीच्या ज्वाळा दृष्टीस पडल्या. यावेळी ज्ञानेश्वर यांच्या घराच्या पडवीत आग लागली असल्याचे लक्षात आले.यावर त्यांनी तत्काळ जाऊन ज्ञानेश्वर व त्यांची पत्नी या दोघांनाही उठविले. आरडाओरडा केल्यानंतर शेजारील व्यक्तींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व बाजूलाच असलेल्या पाण्याच्या टाकीतील पाण्याचा वापर करीत ही आग आटोक्यात आणली.भाऊ अनिल व आनंद तसेच शेजारील व्यक्तींनी शर्थीचे प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, यात घराची पडवी व घराचा अर्धा भाग जळून खाक झाला. तसेच घरातील कपडे व अन्य साहित्य जळून खाक झाले. या घटनेदरम्यान घरात असलेला सिलेंडर प्रसंगावधान राखत बाहेर आणला. अन्यथा आग घरात भडकून नुकसान झाले असते.सतर्कतेमुळे अर्धे घर वाचवण्यात यश आले. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. घराच्या पडवीतून आग वर आली. त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर सरपंच प्रज्ञेश धुरी यांनी तलाठी आर. बी. ढवळ यांना या घटनेची माहिती देताच त्यांनी पंचनामा केला.

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग