वेंगुर्ला : शिरोडा वेळागर येथे श्री देव लींगेंश्र्वर मंदिर च्या पाठी मागे काल सोमवारी रात्री १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. मात्र सामाजिक बांधिलकी जपत ही आग अमरे व भगत कुटुंबीयांनी वेळीच विझविल्याने मोठा अनर्थ टळला.शिरोडा वेळागर येथील नेल्सन सोज व आगुनी सोच हे घरी जात असताना त्यांना मंदिराच्या मागील बाजूस आग लागल्याचे दिसून आले. तात्काळ त्यांनी याबाबत ग्रामपंचायत सदस्य आजू अमरे यांना माहिती दिली.हे समजताच मंदिराचे पुजारी मदन अमरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांच्या सोबत आजु अमरे, सुरज अमरे, आनंद अमरे, निमीश अमरे , प्रकाश भगत, अशोक भगत, सुधीर भगत, समीर भगत, संतोष भगत, प्रज्वल भगत यांनी आग विजवण्याचे आटोक्यात प्रयत्न करून आग विजवण्यात यश मिळविले.मंदिराच्या मागे सुरूची तसेच काजूची झाडे असल्याने आग वेळीच भिजवली नसती तर संपूर्ण भाग जळू खूप मोठी आणि झाली असती. अमरे व भगत कुटुंबियांच्या या सामाजिक कृतीबद्दल त्यांचे गावात अभिनंदन होत आहे.
शिरोडा वेळागर येथील देव लिंगेश्वर मंदिरच्या मागे अचानक लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 16:25 IST
Fire Sindhudurgnews-शिरोडा वेळागर येथे श्री देव लींगेंश्र्वर मंदिर च्या पाठी मागे काल सोमवारी रात्री १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. मात्र सामाजिक बांधिलकी जपत ही आग अमरे व भगत कुटुंबीयांनी वेळीच विझविल्याने मोठा अनर्थ टळला.
शिरोडा वेळागर येथील देव लिंगेश्वर मंदिरच्या मागे अचानक लागली आग
ठळक मुद्देशिरोडा वेळागर येथील देव लिंगेश्वर मंदिरच्या मागे अचानक लागली आगअमरे व भगत कुटुंबीयांच्या प्रसंगावधनांमुळे आग विझविण्यात यश : मोठा अनर्थ टळला