शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

डिजिटायझेशनला अखेर मंजुरी

By admin | Updated: January 15, 2015 23:24 IST

कणकवली नगरपंचायत : सोमवारपासून प्रशासकीय काम सुरू होणार

मिलिंद पारकर -कणकवली -नगरपंचायतीच्या दस्तऐवजांच्या डिजिटायझेशनच्या कामासाठी अखेर प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, खासगी एजन्सीमार्फत हे काम करण्यात येणार आहे. सोमवारपासून हे काम सुरू होणार असल्याचे नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांनी सांगितले. नगरपंचायतीच्या सर्व कागदपत्रांना स्कॅन करून संगणकात साठविले जाणार आहे. या कामासाठी नगरपंचायतीने खासगी एजन्सी नेमली आहे. प्रती कागद एक रुपयाप्रमाणे हे डिजिटायझेशन केले जाणार आहे. नगरपंचायतीमध्ये सुमारे चार लाख कागद आहेत. दस्तांच्या डिजिटायझेशनमुळे कागदपत्र हवे त्यावेळी लगेच उपलब्ध होणे, गहाळ झाल्यामुळे होणारा त्रास वाचणार आहे. रोज पंधरा हजार कागदपत्र स्कॅन करण्याची खासगी एजन्सीची क्षमता आहे. येत्या सोमवारपासून हे काम सुरू होणार आहे. पाणीमीटर बसविणारशहरात सुमारे १५०० नळ जोडण्यात आहेत. नगरपंचायतीने शहरातील सर्व खासगी नळजोडण्यांसाठी पाणीमीटर बसविण्याचे ठरविले आहे. नगरपंचायत स्वखर्चाने मीटर बसविणार आहे. मीटर बसविल्याने पाणी वापर काटकसरीने होऊ शकतो. तसेच वापराएवढे शुल्क आकारले जाणार आहे....अग्निशमन बंबावर सध्या अप्रशिक्षित कर्मचारी काम करतात. नगरपंचायतमधील बंब चालक आणि स्वच्छता निरीक्षक या दोन जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.- प्रज्ञा खोत, नगराध्यक्षावीज बिलात कपातनगरपंचायतीने शहरात अलीकडे सीएफएल दिव्यांच्या जागी एलईडी पथदीप बसविले. हायमास्टवरही एलईडी बल्बचा वापर करण्यात आला आहे. यामुळे वीज बिलात मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. नोव्हेंबरपेक्षा डिसेंबर महिन्याचे वीज बिल २२ हजार ९६० रुपयांनी घटले आहे..शहरातील कचरापेट्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्या जागी गॅल्व्हनाईज्ड कचरापेट्या बसविल्या जाणार आहेत. त्यांचे आयुष्य पंधरा वर्षे असेल. तोपर्यंत सध्याच्या कचरापेट्या दुरुस्त करून घेण्यात येत आहेत. जलशुद्धिकरण केंद्रावर प्रशिक्षित कर्मचारी नाही. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यानंतर जलशुद्धिकरण केंद्र सुरू करण्यात येईल. मालमत्ता कराची आकारणी करण्यासाठी सर्व्हे केला जाणार आहे. मात्र, त्यासाठी माफक दरात सर्व्हे करून देणाऱ्या एजन्सीचा शोध घेतला जात आहे, असे नगराध्यक्षांनी सांगितले.