शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

भराडीदेवीच्या दर्शनासाठी गर्दी, नेत्यांसह सिनेकलाकारांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 03:52 IST

आई भराडी देवीच्या यात्रोत्सवानिमित्त आंगणेवाडीनगरी लाखो भाविकांनी फुलून गेली होती. शनिवारी पहाटे २.३० वाजल्यापासून दर्शनास सुरुवात झाली. राजकीय नेते तसेच सिनेकलाकारांबरोबरच लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.

आंगणेवाडी (जि. सिंधुदुर्ग) : आई भराडी देवीच्या यात्रोत्सवानिमित्त आंगणेवाडीनगरी लाखो भाविकांनी फुलून गेली होती. शनिवारी पहाटे २.३० वाजल्यापासून दर्शनास सुरुवात झाली. राजकीय नेते तसेच सिनेकलाकारांबरोबरच लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या श्री देवी भराडी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासूनच मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. ग्रामस्थ मंडळ, जिल्हा प्रशासन व पोलिसांनी यात्रेचे चोख नियोजन केले होते. शनिवार हा यात्रेचा मुख्य दिवस होता. देवीच्या सुलभ दर्शनासाठी स्वतंत्र दहा रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. शेकडो पोलिसांसह सीसीटीव्ही कॅमेरेही यात्रोत्सवावर लक्ष ठेवून होते. रात्री भाविकांच्या गर्दीने व आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर झळाळून गेला होता. रविवारी मोडयात्रेने यात्रेची सांगता होणार आहे.नारायण राणे, तावडेंनी घेतले दर्शनपहिल्या दिवशी १० लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत, खासदार राजन विचारे, आमदार सुनील प्रभू, मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार आशिष शेलार, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे,आमदार किरण पावसकर,शिवसेनेचे सिंधुुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी, माजी आमदार विजय सावंत,माजी आमदार शिवराम दळवी, संदेश पारकर, यांच्यासह अभिनेते अरुण कदम यांनीही दर्शन घेतले.उद्धव ठाकरेंची मोदींवर टीकायात्रेनिमित्त ठाकरे यांच्या हस्ते ‘सिंधुसरस’ या कृषीप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. राज्यकर्त्यांना आपले देशबांधव काय करतात हे माहीत नाही. मात्र दुसºया देशात काय चालले आहे हे डोकावून पाहण्याची सवय झाली आहे. देशाचा पंतप्रधान हा देशातील जनतेचे प्रश्न, समस्या जाणणारा पाहिजे. भारताला आज देशवासीयांना जगाच्या पाठीवर नेणारा पंतप्रधान लाभणे गरजेचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग