शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली भूमिअभिलेख कार्यालयाविरोधात जनतेचा संताप, वायंगणकर दांपत्याने केले उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 19:07 IST

कणकवली तालुक्यातील फोंडाघाट पावणादेवी येथील मारूती बाळकृष्ण वायंगणकर यांनी कणकवली भूमिअभिलेख कार्यालयात आपली जमिन मोजणीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार सातवेळा मोजणी होऊन देखील हद्द दाखविण्यास संबंधित भूमापकाकडून दुर्लक्ष केला जात आहे. कार्यालयात अनेकदा फेऱ्या मारूनही भूमिअभिलेख अधिकाऱ्यांनी काम पूर्ण करण्यास टाळाटाळ केल्याने मारूती वायंगणकर आणि त्यांची पत्नी विजया वायंगणकर यांनी सोमवारी कार्यालया समोर उपोषणाचा पवित्रा घेतला.

ठळक मुद्देकणकवली भूमिअभिलेख कार्यालयाविरोधात जनतेचा संतापवायंगणकर दांपत्याने केले उपोषण; उपभूमिअभिलेखच्या अधिकाऱ्यांना त्यानंतर आली जाग

कणकवली : कणकवली तालुक्यातील फोंडाघाट पावणादेवी येथील मारूती बाळकृष्ण वायंगणकर यांनी कणकवली भूमिअभिलेख कार्यालयात आपली जमिन मोजणीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार सातवेळा मोजणी होऊन देखील हद्द दाखविण्यास संबंधित भूमापकाकडून दुर्लक्ष केला जात आहे. कार्यालयात अनेकदा फेऱ्या मारूनही भूमिअभिलेख अधिकाऱ्यांनी काम पूर्ण करण्यास टाळाटाळ केल्याने मारूती वायंगणकर आणि त्यांची पत्नी विजया वायंगणकर यांनी सोमवारी कार्यालया समोर उपोषणाचा पवित्रा घेतला.दरम्यान, या आंदोलना नंतर अधिकाऱ्यांना जाग आली असून २९ मे रोजी पुन्हा मोजणी करण्याचे लेखी आश्वासन वायंगणकर याना देण्यात आले आहे. त्यामुळे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

कणकवली भूमिअभिलेख कार्यालयासमोर फोंडाघाट येथील मारूती वायंगणकर व विजया वायंगणकऱ यांनी सोमवारी उपोषण केले.(सुधीर राणे ) कणकवली भूमिअभिलेख कार्यालयात जमीन मोजणीसह अनेक प्रकरणे प्रलंबीत आहेत. कार्यालयातील रिक्तपदे व भूमिअभिलेख उपअधिक्षक प्रभारी असल्याने कामावर परिणाम होत आहे. भूमापकांची कणकवली भूमिअभिलेख कार्यालयात रिक्त पदे असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे जमीन मोजणी करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. नकाशा नक्कल, जमिन मोजणी, प्रापर्टी कार्ड यासह विविध कामांसाठी या कार्यालयात येणाºया पक्षकारांची मोठी हेळसांड होत असल्याने जनतेतुन तीव्र संताप व्यक्त होत आहे.मारूती वायंगणकर फोंडाघाट येथिल ११० गुंठे जमिन मोजणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून कार्यालयात पाठपुरावा करत आहेत. अनेकदा मोजणी तारीख देऊनही भूमापकांकडून टाळाटाळ करण्यात आली. जमिनीतील झाडे वाढल्याने ती तोडण्यासाठी पुन्हा पुन्हा वायंगणकर यांना खर्च करावा लागला आहे. त्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड त्यांना सहन करावा लागला आहे.भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी व भूमापक यांच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून मारूती वायंगणकर व विजया वायंगणकर या दोनही ज्येष्ठांनी उपोषण सुरू केले होते. उपोषण सुरू करताच अधिकाºयांची धावपळ सुरू झाली.त्यानंतर कणकवली भूमिअभिलेख कार्यालयाचे अधिकारी प्रकाश भिसे यांनी वायंगणकर यांच्याशी चर्चा केली. तसेच उपोषणस्थळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीसही दाखल झाले होते. या चर्चेनंतर वायंगणकर यांची मोजणी २९ मे रोजी करून देण्याचे लेखी आश्वासन भिसे यांनी दिले. त्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास वायंगणकर दांपत्याने जमिन मोजणीसाठी केलेले उपोषण मागे घेतले.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग