शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

Sindhudurg: पावसाळ्यात मळगाव घाटीतील रस्त्यावर अपघाताची भिती, गॅस पाईपलाईनचे काम अर्धवट स्थितीत 

By अनंत खं.जाधव | Updated: May 21, 2024 15:32 IST

सावंतवाडी : सावंतवाडी रेडी राज्य मार्गावरील मळगाव घाटीत गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी तोडण्यात आलेले पक्के काँक्रीट गटारीचे काम आता ...

सावंतवाडी : सावंतवाडी रेडी राज्य मार्गावरील मळगाव घाटीत गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी तोडण्यात आलेले पक्के काँक्रीट गटारीचे काम आता पावसाळा तोंडावर असताना देखील अर्धवट स्थितीत आहे. आठ दिवसात हे काम पूर्ण करा अन्यथा मळगाव घाटीतच उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांनी दिला आहे.  मळगाव घाटीतील पक्के काँक्रीट गटार गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी तोडण्यात आले आहेत. गेली दोन वर्षे हे काम सुरू आहे. गतवर्षी देखील गटाराचे काम अर्धवट राहिल्याने पावसाच्या पाण्यासोबत माती रस्त्यावर वाहून आल्याने अनेकांना अपघातांना सामोरे जावे लागले होते. यावर्षी तर पक्के काँक्रीट गटार तोडल्याने व माती तशीच सोडलेली असल्याने पहिल्याच पावसात सर्व माती रस्त्यावर येऊन चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊ शकते. त्यामुळे अपघातांना सामोरे जावे लागणार आहे. याप्रश्नी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे वारंवार लक्ष वेधून देखील कोणतीच हालचाल होत नसल्याचे दिसून येत आहे. लाखो रुपये खर्च करून दोन वर्षांपूर्वीच हे गटार काँक्रीटने बांधण्यात आले होते. मात्र गॅस पाईपलाईनसाठी ते ब्रेकरने तोडण्यात आले. त्यामुळे रस्ता वाहून जाण्याची भीती देखील निर्माण झाली आहे.एकीकडे सावंतवाडी शहरातील खोदण्यात आलेला रस्ता तसेच साईडपट्टी डांबरीकरणाने पूर्ववत केलेली असताना मळगाव घाटी तसेच घाटीच्या खालील गावात असलेली गटार व साईडपट्टी मात्र दुर्लक्षित आहे. त्यामुळे येथे आठ दिवसात सदर गटार पूर्वीप्रमाणेच काँक्रीटने बांधून मिळावेत तसेच साईड पट्टीची ही काँक्रीटनेच डागडूजी करण्यात यावी, अशी मागणी सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. तसेच याबाबत टाळाटाळ झाल्यास ग्रामस्थांसह मळगाव घाटीतच उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग