शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला सर्वोत्तम ई पेमेंट उपक्रम एफसीबीए २०२२ पुरस्कार जाहीर

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 10, 2022 12:06 IST

राष्ट्रीय स्तरावरील संस्था तसेच बँकिंग फ्रंटायर्स यासारख्या इंग्रजी मासिकाने बँकेच्या कामकाजाची घेतली दखल

सिंधुदुर्ग :  देशातील सहकारी बँकिंग संस्थांचे आर्थिक मूल्यमापन करून त्यांच्या वार्षिक कामगिरीच्या आधारे गुणवत्ता मानांकन ठरवणारी संस्था नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव बँक आणि बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य इंग्रजी मासिक Banking Frontiers यांच्यामार्फत बँकिंग क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या सहकारी बँकांचा गौरव करण्यात येतो यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सर्वोत्तम ई पेमेंट उपक्रम (Best ePayment Initiative) विभागा साठी एफसीबीए २०२२ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.हा पुरस्कार मध्यप्रदेश इंदोर येथे रविवार दि.१६ ऑक्टोंबर २०२२ रोजी प्रदान करण्यात येणार आहे. बँकांच्या कामकाजाचा लेखाजोखा घेऊन बँकिंग क्षेत्रामध्ये बँकांनी  केलेल्या प्रगतीच्या आधारे तसेच ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली अत्याधुनिक सेवा इत्यादी बाबी विचारात घेऊन विविध कॅटेगिरी मधील पुरस्कारांसाठी संबंधित बँकांची निवड करण्यात येते.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने कोअर बँकिंग सुविधा व स्वतःचे डाटा सेंटर उभारून ग्राहकांना, व्यापारी बँकांच्या बरोबरीने जिल्ह्यात बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बँकेच्या दुर्गम भागातही असलेल्या शाखा सीबीएस संगणकिकृत केल्या आहेत.त्याचबरोबर जिल्ह्यातील ९८ शाखांबरोबरच ३८ एटीम मशीन्स, मोबाईल अँपद्वारे एन इएफटी/आय एम पीएस सेवा, पॉस मशिन, युपीआय, शाखा स्तरावर बीबीपीएस, इत्यादी आधुनिक डिलिव्हरी चॅनेल्स ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहेत. अन्य जिल्हा बँकेच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मोबाईल ॲप ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. यू पीआय वापरणा-या  ग्राहकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.या सर्वांचे मूल्यमापन एफसीबीए २०२२च्या निवड समितीमध्ये होऊन बँकेला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. अशाप्रकारे राष्ट्रीय स्तरावरील संस्था तसेच बँकिंग फ्रंटायर्स यासारख्या इंग्रजी मासिकाने बँकेच्या कामकाजाची दखल घेतली आहे. बँकेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर व  बँकेचे संचालक मंडळ यांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गbankबँक