शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शिकारीच्या उद्देशाने सोडलेल्या वीज प्रवाहामुळे पितापुत्राचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 18:29 IST

mahavitaran Kudal Sindhudurg- कुडाळ तालुक्यातील बाव घोडे खुटवळ येथील शेतात डुक्कराची शिकार करण्यासाठी शेतात सोडलेल्या वीज तारेचा प्रवाहाचा शॉक लागल्याने कविलकट्टा येथील दिपक भगवान मांतोडकर व भगवान दिपक मातोंडकर हे पिता पुत्राचां जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.  हा वीज तारेचा प्रवाह या दोघानीच शिकारीच्या उद्देशाने सोडल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळत आहे असे कुडाळ पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देशिकारीच्या उद्देशाने सोडलेल्या वीज प्रवाहामुळे पितापुत्राचा जागीच मृत्यूया दोघानीच शेतात शिकारीच्या उद्देशाने वीजप्रवाह सोडल्याची माहिती

कुडाळ : तालुक्यातील बाव घोडे खुटवळ येथील शेतात डुक्कराची शिकार करण्यासाठी शेतात सोडलेल्या वीजप्रवाहाचा शॉक लागल्याने कविलकट्टा येथील दिपक भगवान मांतोडकर व भगवान दिपक मातोंडकर हे पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.  हा वीजप्रवाह या दोघानीच शिकारीच्या उद्देशाने सोडल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळत आहे असे कुडाळ पोलिसांनी सांगितले. सोमवारी पहाटे 06.45 वाजण्याच्या सुमारास बाव येथील बळवंत परब हे त्यांच्या शेतातील नाचण्याची कणसे काढण्यासाठी गेले असताना त्यांना इलेक्ट्रीक तारेचा शॉक लागुन ते शेतात पडल्याचे आजुबाजुच्या लोकांनी पाहिल्यावर त्यांना कुडाळ ग्रामीण रूग्णालयात उपचाराकरीता आणले.बळवंत परब यांना शेतातुन उचलुन रूग्णालयात पाठविल्यानंतर शेतात वीज प्रवाह कोठुन येतो? वायर कुठ पर्यंत पडलेली आहे, हे पाहण्यासाठी बाव सरपंच नागेश परब तसेच इतर काही ग्रामस्थ पाहणी करीत असताना पुढे 200 मीटर अंतरावर बाव घोडे खुटवळ या शेतात कविलकट्टा येथे राहणारे दिपक भगवान मांतोडकर व भगवान दिपक मातोंडकर हे पिता पुत्र शेतात एकाच ठिकाणी पडलेले होते. त्यांची हालचाल होत नसल्यामुळे तेथील उपस्थितांनी त्या दोघांनाही कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे आणले. तेथे त्यांना तपासले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांचा वीजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याचे घोषीत केले.प्राथमिक तपासात अशी माहिती मिळाली की, डुक्कराची शिकार करण्यासाठी या शेतावरून जाणाऱ्या वीजवाहीन्यांवर बांबुच्या सहाय्याने तारेचा हुक टाकुन हा वीज प्रवाह प्रवाहीत करण्यात आला होता. जेणेकरून तेथे आलेल्या डुक्करानां त्याचा शॉक लागुन त्याची शिकार करता यावी. डुक्कर पकडण्यासाठी तारेचा वीज प्रवाह तेथील शेतात सुमारे 200 मीटर अंतरावर पसरला होता.  या वीज प्रवाहाचा जोरदार शॉक दिपक मातोंडकर व भगवान मातोंडकर या पिता-पुत्राना लागल्याने त्यांना जीव गमवावा लागला. वीज प्रवाह शेतात दिपक व भगवान यांनी शिकार करण्यासाठी सुरू केला होता का? याचा तपास कुडाळ पोलिस करीत आहेत.सकाळी शेतात जाणारे बळवंत परब हे जखमी झाले असुन त्यांनाही कुडाळ ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने अजुनही शेतकरी शेतात येत होते मात्र या ठिकाणी मोठी दुर्घटना टळली. घटना समजताच तत्काळ बाव सरपंच नागेश परब कुडाळ पोलिस व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असुन या प्रकरणाचा अधिक तपास कुडाळ पोलिस करीत आहेत. दिपक व भगवान यांच्या मृत्युमुंळे मांतोडकर कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला असुन दिपक यांच्या पत्नी तर भगवान याच्या पश्चात पत्नी, दोन वर्षाचा लहान मुलगा, आई असा परिवार आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्गkudal police stationकुडाळ पोलिस स्टेशन