शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी उपोषण

By admin | Updated: September 1, 2014 23:57 IST

खुडी माध्यमिक विद्यालय वाद : कोटकामते संस्थाचालक, पालक-शिक्षक आक्रमक

ओरोस : देवगड तालुक्यातील खुडी माध्यमिक विद्यालय ही अनधिकृत शाळा तत्काळ बंद करावी, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी देवगड तालुक्यातील श्री भगवती माध्यमिक विद्यालय कोटकामतेचे संस्थाचालक, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडले आहे.जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, देवगड तालुक्यात खुडी माध्यमिक विद्यालय ही अनधिकृत शाळा जून २०११ पासून सुरू असून याचा परिणाम आपल्या बृहत योजनेतील मान्यताप्राप्त अनुदानित शाळेवर दिसून येत आहे. कोणतीही शाळा शासन अथवा संबंधित प्राधिकरणाच्या मान्यता तसेच नाहरकत प्रमाणपत्राशिवाय शाळा चालविल्यास १ लाख रूपये दंडाची शिक्षा व त्यानंतरही सुरू ठेवल्यास प्रतिदिन दहा हजार रूपये दंडाची तरतूद अधिनियमात आहे. माध्यमिक शिक्षण विभागाकडून शाळा बंद करण्याची अंतिम नोटीस देऊन शाळा बंद झालेली नाही. तसेच कार्यालयामार्फत दंडही वसूल करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणतीही कारवाई न करता केवळ नोटीसा देण्याचे काम करीत हा विभाग या अनधिकृत शाळेला पाठीशी घालत आहे. या अनधिकृत शाळेमुळे आमच्या शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने शाळेतील शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. त्याचा परिणाम भावी काळात शाळेच्या गुणवत्तेवर होणार आहे. त्यामुळे खुडी माध्यमिक विद्यालय ही अनधिकृत शाळा तत्काळ बंद करावी व त्यांच्यावर दंडासह फौजदारी कारवाई करावी. या मागणीसाठी श्री भगवती माध्यमिक विद्यालय कोटकामतेचे संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण केले. या उपोषणाला मुख्याध्यापक सुभाष दहिबावकर, संस्थाचालक लवू राणे, विजय कुडपकर, शिक्षक प्रतिनिधी सूर्यकांत म्हसकर, किरण राऊळ, दाजी घाडी, पालक सुनील कामतेकर, पुरूषोत्तम चिंदरकर, राजू कदम, नम्रता मिशाळ आदी उपोषणाला बसलेले आहेत.खुडी माध्यमिक विद्यालय दंडास पात्रखुडी माध्यमिक विद्यालय अनधिकृत असून या शाळेत ९० विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ३१ मे रोजी शाळा बंद करण्याची नोटीस दिली आहे. सन २०१३-१४ मध्ये शाळा बंद करण्याबाबत स्टॅम्पपेपरवर करारपत्र करून शाळा बंद करण्याची लेखी हमी संबंधित संस्था चालकांनी दिली असतानाही शाळा अनधिकृतपणे सुरू ठेवण्यात आली आहे. याचा इतर शाळांवर परिणाम होत आहे. तरी बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार १ लाखाचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास मुख्याध्यापक व संस्था जबाबदार असेल असे स्पष्ट करतानाच अनधिकृत शाळेत पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी देवीदास कुलाल यांनी केले आहे. संबंधित खुडी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना नोटीस बजावण्यात आल्याचेही यावेळी स्पष्ट केले. (वार्ताहर)