शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

जिंकू किंवा मरु; उपोषण आजपासून सुरु!, महिलादिनीच वैभववाडीत टपरीधारक महिलांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 18:33 IST

जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्तीचा गौरव सुरु असतानाच वैभववाडीत महिलांचा आक्रोश

प्रकाश काळे वैभववाडी (सिंधुदुर्ग): जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्तीचा गौरव सुरु असतानाच वैभववाडीत मात्र टपऱ्या हटवून रोजीरोटी हिरावणाऱ्या नगरपंचायत प्रशासनाच्या कारवाईच्या निषेधार्थ महिलादिनी उध्वस्त झालेल्या टपरीधारक महिला आक्रोश करताना दिसल्या. राष्ट्रपुरुष, समाजसुधारकांच्या प्रतिमांसह वैभववाडी शहरातून मोर्चा काढून तहसील कार्यालयासमोर या महिलांनी उपोषण सुरु केले आहे. तर बाजूलाच नगरपंचायत प्रशासना विरोधात अपक्ष नगरसेविका अक्षता जैतापकर याही उपोषणाला बसल्या आहेत.शहरातील 'टपरी हटाव' मोहिमेविरोधात टपरीधारक महिलाचे उपोषण सुरु आहे. काही दिवसांपूर्वी शहरात 'टपरी हटाव' मोहिम नगरपंचायतीने राबविली. शहरातील सर्व टपऱ्या हटविल्यामुळे अनेक कुटुंबांचे रोजगार गेले आहेत. प्रशासनाने पुन्हा टपऱ्या लावण्यास परवानगी द्यावी; यासाठी टपरीधारक महिला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रशासन रस्त्यावर उतरल्या आहेत. दत्तमंदिर येथून हातात विविध घोषवाक्यांचे फलक घेऊन घोषणा देत मोर्चाने महिला तहसीलसमोर दाखल झाल्या. तेथे त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.त्याचबरोबर अपक्ष नगरसेविका अक्षता जैतापकर यांनी नगरपंचायत प्रशासनाविरोधात उपोषण सुरू केले आहे. नगरपंचायत प्रशासनाकडे मागणी केलेली कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही. तसेच नगरपंचायतीच्या सभांना पत्रकारांना निमंत्रित केले जात नाही. ह्या गोष्टी प्रशासन जाणूनबुजून करत आहे, असा जैतापकर यांचा आरोप आहे. याबाबत संबधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी; अशी मागणी केली आहे. दरम्यान, या दोन्ही उपोषणाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी पाठिंबा दिला आहे.

हाच का महिला सन्मान ?सकाळी ११ वाजल्यापासून ही दोन्ही उपोषणे सुरु असून टपरीधारक महिलांच्या घोषणांनी तहसीलचा परिसर दणाणून गेला. मात्र याठिकाणी तालुक्यातील एकही जबाबदार अधिकारी उपोषणास बसलेल्या महिलांशी चर्चेसाठी फिरकले नाहीत. हीच का प्रशासनाची महिलांप्रती आदराची भुमिका? हाच का महिलांचा सन्मान? असा सवाल उपोषणकर्त्या महिला करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गvaibhavwadiवैभववाडीWomenमहिला