शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, के. मंजुलक्ष्मी यांनी वेधले विमा कंपनीचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 18:43 IST

collector Sindhudurg Farmar- खरीप हंगाम पीक विमा योजनेंतर्गत ३५२५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी २ कोटी ५९ लाख, तर शासनाकडून २१ कोटी ९६ लाख अशा एकूण २४ कोटी ५५ लाखांचा विमा भरून ५८९.२५ हेक्टर भातपिकाचे क्षेत्र संरक्षित करण्यात आले होते. मात्र, यात केवळ १०६.९८ हेक्टर भातपिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी केवळ ४०० शेतकऱ्यांना २३ लाख ६२ हजार रुपयांची नुकसाभरपाई विमा कंपनीकडून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी के. मंजुलक्ष्मी यांनी वेधले विमा कंपनीचे लक्ष

सिंधुदुर्गनगरी : खरीप हंगाम पीक विमा योजनेंतर्गत ३५२५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी २ कोटी ५९ लाख, तर शासनाकडून २१ कोटी ९६ लाख अशा एकूण २४ कोटी ५५ लाखांचा विमा भरून ५८९.२५ हेक्टर भातपिकाचे क्षेत्र संरक्षित करण्यात आले होते. मात्र, यात केवळ १०६.९८ हेक्टर भातपिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी केवळ ४०० शेतकऱ्यांना २३ लाख ६२ हजार रुपयांची नुकसाभरपाई विमा कंपनीकडून देण्यात आली आहे.दरम्यान, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या योजनेत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, सर्वच्या सर्व ३५२५ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, याकडे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी विमा कंपनीचे लक्ष वेधले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२० अंतर्गत पीक विमा घेण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ३५२५ बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता. यासाठी शेतकऱ्यांनी २ कोटी ५९ लाख रुपये; तर शासनाकडून २१ कोटी ९६ लाख रुपये असे एकूण २४ कोटी ५५ लाख रुपये विमा कंपनीकडे भरून ५८९.२५ हेक्टर भातपीक क्षेत्र संरक्षित केले होते.नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीने तत्काळ विमा कंपनीला सादर करण्याची अट या योजनेत ठेवण्यात आली होती. त्यानुसार नुकसानीची माहिती सादर केलेल्या ४०० शेतकऱ्यांना विमा कंपनीने प्रतिहेक्टरी २३ हजार रुपयांप्रमाणे २३ लाख ६२ हजार रुपये नुकसाभरपाई दिली आहे.सन २०२० च्या खरीप हंगामात चांगला पाऊस पडल्याने भातकापणीच्या वेळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत होती.या मागणीची जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दखल घेत सर्वच शेतकऱ्यांकडे मोबाईल किंवा ऑनलाईन माहिती देण्याची यंत्रणा उपलब्ध नाही. इंटरनेट सुविधा गावोगावी नाही. भातशेतीचे नुकसान होत असताना उर्वरित भातशेतीचे नुकसान होऊ नये याकडे लक्ष असल्याने ते नुकसानीची माहिती सादर करू शकले नाहीत. त्यामुळे विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी सूचना के. मंजुलक्ष्मी यांनी इफ्को टोकियो या विमा कंपनीला केली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग