शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

घराच्या वादातून कुटुंबाला मारहाण, वृद्ध महिलेसह चौघेजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 11:43 IST

घर मालकीच्या वादातून सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा भागात असलेल्या एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. यात एका वृद्ध महिलेसह चौघेजण जखमी झाले आहेत. घरकामासाठी आणलेले पत्रे तसेच वेल्डिंगच्या मशीनचीही मोडतोड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देघराच्या वादातून कुटुंबाला मारहाण,वृद्ध महिलेसह चौघेजण जखमीसावंतवाडी-खासकीलवाडा येथील घटना

सावंतवाडी : घर मालकीच्या वादातून सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा भागात असलेल्या एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. यात एका वृद्ध महिलेसह चौघेजण जखमी झाले आहेत. घरकामासाठी आणलेले पत्रे तसेच वेल्डिंगच्या मशीनचीही मोडतोड करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांना माहिती देऊनही पोलीस वेळेत घटनास्थळी गेले नसल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांनाच घेराव घालत जाब विचारला. अखेर उशिरा पोलिसांनी घडलेल्या घटनेचा पंचनामा केला.या घटनेत वृध्देसह चौघांना मारहाण केली. मारहाण झालेल्या संबंधित वृध्देसह इतरांनी पोलिसांना माहिती दिली. पण ठाणे अंमलदार देवानंद माने यांनी वेळेत या प्रकरणाची दखल घेतली नाही. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास शिवसेनेच्या नगरसेविका अनारोजीन लोबो, नीता कविटकर, सागर नाणोस्कर, माजी नगरसेवक सुदन आरेकर, राजू धारपवार, दीपेश शिंदे, भूषण वेंगुर्लेकर, सद्गुरू पाटील, केतन पार्सेकर, शिवा गावडे, अजय कवठणकर, केतन मुंज, निमिष पटेकर, साई खोचरे, शुभम कदम यांच्यासह तीस ते चाळीस नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना जाब विचारला.

तुम्ही एका वृध्देला मारहाण होत असताना तक्रार का दाखल करून घेत नाही, असा सवाल यावेळी केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा व गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात जयवंत घोगळे यांनी तक्रार दिली असून, या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.सावंतवाडी खासकीलवाडा येथील एका घराच्या मालकीवरून दोघांत वाद आहेत. येथील न्यायालयात हा वाद सुरू आहे. तर दुसरीकडे संबंधित कुटुंबाला त्या घराची दुरुस्ती करा, अशा सूचना नगरपालिकेकडून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या घराच्या दुरुस्तीचे काम शनिवारी सुरू होते. मात्र, या बांधकामाला आलेल्यांनी विरोध करीत हे बांधकाम तसेच तेथील सामानाची मोडतोड केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग