शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या खासदार , आमदार , पालकमंत्र्यांकडून जनतेला खोटी आमिषे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 15:06 IST

सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या खासदार , आमदार व पालकमंत्र्यांकडून जनतेला खोटी आमिषे दाखविणे सुरू असून विविध विकासकामांची फक्त भूमिपूजने करण्यात येत आहेत. सध्या टीव्हीवर गाजत असलेल्या ' अल्टी - पल्टी ' मालिकेप्रमाणेच या तिघांचे ' अल्टी,पल्टी, कल्टी' असे कारनामे विकासकामांबाबत सुरू आहेत. अशी टीका मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेच्या खासदार , आमदार , पालकमंत्र्यांकडून जनतेला खोटी आमिषेपरशुराम उपरकर यांची टीका ; अल्टी,पल्टी, कल्टी' कारनामे सुरू

कणकवली : सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या खासदार , आमदार व पालकमंत्र्यांकडून जनतेला खोटी आमिषे दाखविणे सुरू असून विविध विकासकामांची फक्त भूमिपूजने करण्यात येत आहेत. सध्या टीव्हीवर गाजत असलेल्या ' अल्टी - पल्टी ' मालिकेप्रमाणेच या तिघांचे ' अल्टी,पल्टी, कल्टी' असे कारनामे विकासकामांबाबत सुरू आहेत. अशी टीका मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर उपस्थित होते.यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी कणकवली येथे ट्रामा केअर सेंटर उभारणार असे आश्वासन दिले होते. त्यांनंतरच्या पाच वर्षांच्या कालावधीत त्यांनी तिकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.

त्याचप्रमाणे कुडाळ येथे महिलांसाठी शासकीय रुग्णालय उभारण्याचेही आश्वासनही देण्यात आले होते. तेही पूर्ण करण्यात आलेले नाही. आता पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल १८ महिन्यात उभारण्याचे आश्वासन देऊन भूमिपूजन केले आहे. ते आश्वासनही फसवेच ठरणार आहे.जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था संपूर्ण खिळखिळी झाली आहे. तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णांना गोवा, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी जावे लागते. सामान्य जनतेला चांगले उपचार जिल्ह्यात मिळणे आवश्यक असताना त्याबाबत कोणीच काही करीत नाहीत.पालकमंत्र्यांकडे जादुई शक्ती आहे का ?सावंतवाडी येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल १८ महिन्यात उभारण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे. इतक्या कमी कालावधीत हे आश्वासन पूर्ण होण्यासाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर सांगतात त्याप्रमाणे पालकमंत्र्यांकडे जादुई अथवा कोणती तरी शक्ती आहे का ? हे त्यांनी स्पष्ट करावे.

पालकमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे चिपी विमानतळावर गणेशोत्सवात विमान उतरले नाही. मात्र, निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्या तरी नेत्याचे विमान तिथे उतरेलही. पण प्रवासी विमान कधी उतरणार ते पालकमंत्र्यांनी जाहीर करावे. अजून किमान वर्षभर तरी प्रवासी विमान तिथे उतरणार नाही. कारण अजूनही त्यासाठी लागणाºया बºयाच परवानग्या मिळायच्या अजूनही बाकी आहेत. असेही उपरकर म्हणाले.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग