शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांना हापूस आंबा ऑनलाईन खरेदीची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 17:34 IST

Mango Sindhudurg : हापूस आंबा ग्राहकांना ऑनलाइन पोर्टलद्वारे आपली मागणी थेट शेतकऱ्यांकडे नोंदविण्यासाठी कृषी पणन मंडळाने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी संकेतस्थळावरील लिंकद्वारे ग्राहकांना आंबा खरेदी करता येणार आहे. त्यामुळे या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी पणन मंडळामार्फत करण्यात आले आहे.

ठळक मुद्देग्राहकांना हापूस आंबा ऑनलाईन खरेदीची सुविधा थेट शेतकऱ्यांकडे मागणी : आंबा उत्पादकांची नोंदणी सुरू

वेंगुर्ला : हापूस आंबा ग्राहकांना ऑनलाइन पोर्टलद्वारे आपली मागणी थेट शेतकऱ्यांकडे नोंदविण्यासाठी कृषी पणन मंडळाने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी संकेतस्थळावरील लिंकद्वारे ग्राहकांना आंबा खरेदी करता येणार आहे. त्यामुळे या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी पणन मंडळामार्फत करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे दरवर्षी कोकणातील हापूस आंबा शहरातील ग्राहकांना थेट कोकणातील उत्पादकांद्वारे उपलब्ध व्हावा यासाठी आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आंबा महोत्सवाचे आयोजन करणे अद्याप शक्य झालेले नाही.

कोकणातील आंबा उत्पादकांना विक्रीसाठी शहरात यावे लागू नये तसेच शहरातील ग्राहकांनाही घराबाहेर किंवा सोसायटीबाहेर पडावे लागू नये याकरिता उत्पादक व ग्राहक या दोघांनाही ऑनलाइन पोर्टलद्वारे आंबा खरेदी-विक्रीची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या www.msamb.com  या संकेतस्थळावरील buyer seller information लिंकद्वारे अथवा bs.msamb.com   या लिंकद्वारे खरेदीदारांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कृषी पणन मंडळाने सदर पोर्टलवर कोकणातील हापूस आंबा उत्पादकांची नोंदणी सुरू केली आहे.त्यामध्ये आंबा उत्पादकांचे नाव, संपर्क क्रमांक, आंबा उपलब्ध तपशील आदी माहिती पोर्टलवर उपलब्ध होणार आहे.त्यामुळे पुणे, मुंबई तसेच इतर शहरातील वैयक्तिक ग्राहक अथवा सहकारी गृहनिर्माण संस्था इत्यादी सर्वांना त्याची मागणी पोर्टलवर नोंदविता येईल किवा विशिष्ट आंबा उत्पादकांशी संपर्क करता येऊ शकेल व आंबा खरेदीबाबत तातडीने कार्यवाही करून शहरातील ग्राहकांना त्यांच्या घरी आंबा पोहोच करू शकतील. आंबा खरेदीकरिता किमान मर्यादा १०० डझन असणार आहे.ग्राहकांची कृषी पणन मंडळाच्या पोर्टलवर नोंदणीकृषी पणन मंडळाकडून कोकणातील दर्जेदार व नैसर्गिकरीत्या पिकवलेला हापूस आंबा शहरातील ग्राहकांना थेट उत्पादकांकडून उपलब्ध व्हावा यासाठी आंबा उत्पादकांनी पोर्टलवर विक्रेता म्हणून व ग्राहकांची कृषी पणन मंडळाचे पोर्टलवर खरेदी म्हणून नोंदणी करावी. तसेच उपलब्ध आंबा अथवा आंब्याची मागणी नोंदवावी, असे आवाहन कृषी पणन मंडळामार्फत करण्यात येत आहे.

टॅग्स :Mangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग