शहरं
Join us  
Trending Stories
1
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
2
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
3
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
4
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
5
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
6
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
7
Who is Vidwath Kaverappa? १७व्या वर्षापर्यंत हॉकी खेळला अन् मग क्रिकेटकडे वळला... त्याने फॅफ, विल जॅक्सला पाठवले मागे
8
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
9
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
10
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
11
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
12
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
13
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
14
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
15
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
16
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
17
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
18
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
19
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
20
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा

कागदी लगद्यापासून बनविल्या आकर्षक वस्तू

By admin | Published: January 22, 2017 11:43 PM

कणकवली विद्यामंदिरच्या चित्रकलेला वाव : महाराष्ट्र शासन हस्तकला विभाग मुंबईच्यावतीने आयोजन

प्रदीप भोवड ल्ल कणकवलीमहाराष्ट्र शासन हस्तकला विभाग मुंबई कार्यालयाच्यावतीने आयोजित कागदी लगद्यापासून बनवलेल्या आकर्षक वस्तू सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गणेशमूर्ती व फळफळावळही सर्वांगसुंदर आहेत. सिंधुदुर्गातील सुमारे ३0 प्रशिक्षणार्थींनी बनवलेल्या या वस्तूंना बाजारात चांगली मागणी मिळेल अशी आशा या प्रशिक्षण वर्गाचे व्यवस्थापक, विद्यामंदिर प्रशाला कणकवलीचे कलाशिक्षक प्रसाद राणे व प्रशिक्षक अविनाश पाटकर यांनी व्यक्त केली आहे. कागदी लगद्यापासून वस्तू बनविण्याचे १६ दिवसांचे प्रशिक्षण येथील विद्यामंदिर प्रशालेत आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक हेमंत खोत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षण वर्गात ३0 जण सहभागी झाले होते. प्रशिक्षणार्थींनी बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, गणेशमूर्ती, फळफळावळ पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले. विद्यामंदिर प्रशालेत आयोजित प्रदर्शनाचा लाभ सुमारे २00 जणांनी घेतला. असे प्रशिक्षण आयोजित करून सुशिक्षित महिलांच्या हातालाही काम द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रशिक्षणामध्ये १८ वर्षांपासून ७२ वयोमानाचे गृहस्थही सहभागी झाले होते. हे प्रशिक्षण शासनमान्य असून या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्रही दिले जाते. शिवाय शासनाच्या विविध योजनांमध्ये या प्रशिक्षणाचा लाभ मिळतो. या प्रशिक्षण वर्गात सहभागी झालेले काही विद्यार्थी, काही गृहिणी तर काही मूर्तिकारही होते, अशी माहिती प्रसाद राणे यांनी दिली. आपल्या जिल्ह्यातील सर्वसामान्य कलाकारांना शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा या उद्देशाने या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन कणकवलीत करण्यात आल्याचे प्रसाद राणे यांनी सांगितले. हे प्रशिक्षण पूर्णत: मोफत होते. या प्रशिक्षणार्थींना आर्टिझन कार्ड व आम आदमी विमा योजना पॉलिसी विना शुल्क काढून देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी खास मुंबईहून आलेले अविनाश पाटकर यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामध्ये प्लॅस्टरचा साचा व रबरचा साचा तयार कसा करावा या गोष्टीही शिकविण्यात आल्या. या प्रशिक्षणामधून सर्व प्रशिक्षणार्थींना उत्पन्नाचा व व्यवसायाचा एक नवा मार्ग मिळाला आहे. सर्व प्रशिक्षणार्थींनी वेगवेगळया आकाराच्या सुमारे ४00 आकर्षक वस्तू बनविल्या. या प्रशिक्षणवर्गाचे उद्घाटन कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या हस्ते झाले होते. विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक हेमंत खोत व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रशिक्षण वर्ग यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभले.