शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन, २00 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 15:49 IST

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना सिंधुदुर्गच्यावतीने  एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला. या लाक्षणिक संपाबरोबरच २०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करीत अनोखे आंदोलन केले.

ठळक मुद्देमहसूल कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन२00 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना सिंधुदुर्गच्यावतीने  एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला. या लाक्षणिक संपाबरोबरच २०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करीत अनोखे आंदोलन केले.दरम्यान, हा एक दिवसाचा लाक्षणिक संप १०० टक्के यशस्वी झाला असल्याचा दावा या संघटनेच्यावतीने करतानाच ५ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याच्या निर्णयावर ठाम असल्याचेही स्पष्ट केले आहे.महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले असून शनिवारी राज्य संघटनेच्या आदेशानुसार एक दिवसीय लाक्षणिक संपादिवशी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे करण्यात आले होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे २०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यात सहभागी होत रक्तदान करून आरोग्य तपासणी करून घेतली. या शिबिरात पंधरा रक्तदात्यांनी रक्तदान केले. काही अधिकारी, कर्मचारी यांची आरोग्य तपासणी केली असता मधुमेह, उच्च रक्तदाब आढळून आल्याने अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना रक्तदान करण्याची इच्छा असूनही ते रक्तदान करू शकले नाहीत.रक्तदान केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हा रक्तपेढीमार्फत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याबद्दल जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानण्यात आले. त्याचप्रमाणे या एकदिवसीय लाक्षणिक संपादिवशी जनतेच्या झालेल्या गैरसोईबद्दल संघटनेच्यावतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी कर्मचारी संघटनेचे संतोष खरात, सत्यवान माळवे, अशोक पोळ, परमेश्वर फड, दीपक महाडिक, शिवराज चव्हाण, संभाजी खाडे, नरेंद्र एडके, स्वप्नील प्रभू, मनोज काळे, संदीप हांगे, गावकर, पाडावे असे पदाधिकारी हजर होते.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीsindhudurgसिंधुदुर्ग