शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बारसूमध्ये अज्ञातांनी स्फोटक साहित्य आणले, नीलेश राणेंचा गौप्यस्फोट 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 3, 2023 18:51 IST

उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन या स्फोटक साहित्याने काहीतरी अनुचित घटना घडविण्याच्या ‘त्या’ व्यक्तींचा मानस असल्याचेही सांगितले

सिंधुदुर्ग : ज्यांच्या जमिनी बारसूमध्ये नाहीत, जे कोकणातील नाहीत अशा व्यक्ती बारसू परिसरात फिरताना दिसून येत आहेत. या माणसांनी जिलेटिन स्टिकसारखी स्फोटक साहित्य बारसूमध्ये आणल्याचे सांगत ६ मे रोजी येथे होत असलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन या स्फोटक साहित्याने काहीतरी अनुचित घटना घडविण्याच्या ‘त्या’ व्यक्तींचा मानस असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच याबाबत ५ तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रत्नागिरी पोलिस अधीक्षक यांचे लक्ष वेधणार असल्याचेही त्यांनी सांगितले येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आनंद शिरवलकर आदी उपस्थित होते.नीलेश राणे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून वाद प्रतिवाद होत आहेत. मात्र, त्याचा अनुचित फायदा घेण्यासाठी काही माणसे जिल्ह्यात दाखल झाली आहेत. ६ मे रोजी बारसूमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आहे. याठिकाणी नागरिकांची गर्दी असणार आहे. त्यामुळे या गर्दीचा फायदा घेऊन या स्फोटक साहित्याने काही तरी अनुचित घटना घडविण्याच्या त्या व्यक्तींचा मानस आहे. असे स्फोटक साहित्य आणण्यामागे कोणता कट आहे का, याबाबत पोलिस यंत्रणेने तपास करावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.आधी त्यांनी बारसूमध्ये जावून दाखवावेआमदार राजन साळवी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी दोन हात करण्याचे दिलेल्या आव्हानाबाबत नीलेश राणे म्हणाले, राजन साळवी यांनी अगोदर बारसूमध्ये जावून दाखवावे मगच त्यांनी आमच्याशी दोन हात करण्याची भाषा करावी....तर आम्हीही समर्थनार्थ मोर्चा काढूबारसूमधील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभा घेऊन विरोध करणार असतील तर आम्हीही या प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोर्चा काढू, असेही नीलेश राणे यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBarsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्पUddhav Thackerayउद्धव ठाकरेNilesh Raneनिलेश राणे