शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

प्रशिक्षण कार्यक्रमांवर झालेला खर्च संशयास्पद, लाखो रुपयांचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 15:49 IST

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेंतर्गत प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमावर झालेला लाखो रुपये खर्च संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जेवणासह लेखन साहित्य खरेदीत घोळ झाल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे. या अवास्तव खर्चाबाबत पंचायत समितीचे पदाधिकारी मात्र, अनभिज्ञ आहेत. सर्व पीपीई खरेदीत गोलमाल करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांनेच स्वत:चा हंडा भरल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्दे प्रशिक्षण कार्यक्रमांवर झालेला खर्च संशयास्पद, लाखो रुपयांचा घोळसुरमई जेवणाची बिले; पंचायत समिती स्तरावर झाले होते प्रशिक्षण

वैभववाडी : राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेंतर्गत प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमावर झालेला लाखो रुपये खर्च संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जेवणासह लेखन साहित्य खरेदीत घोळ झाल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे. या अवास्तव खर्चाबाबत पंचायत समितीचे पदाधिकारी मात्र, अनभिज्ञ आहेत. सर्व पीपीई खरेदीत गोलमाल करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांनेच स्वत:चा हंडा भरल्याची चर्चा आहे.पंचायत समिती पदाधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवकांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे १५ व १६ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमावर पंचायत समिती स्तरावरून १ लाख ३१ हजार ६१५ रुपये खर्च करण्यात आला आहे. यामध्ये जेवण व नाश्त्यावर तब्बल ४१ हजार ५२० रुपये, प्रोजेक्टर, बॅनर आणि इतर १६ हजार रुपये, साऊंड सिस्टीमवर ९ हजार रुपये, चहा व पाणी ९ हजार ६७५ रुपये, स्टेशनरी साहित्य ३९ हजार २२० रुपये आणि मार्गदर्शक तज्ज्ञांना मानधन म्हणून १४ हजार रुपये असे एकूण १ लाख ३१ हजार ६१५ रुपये खर्च दाखविण्यात आले आहेत.

या दोन दिवसीय प्रशिक्षणाला १३० प्रशिक्षणार्थी उपस्थित असल्याचे ह्यदाखविण्यातह्ण आले आहे. एका शेतकरी गटाला दोन दिवसांचे जेवण, नाश्ता आणि चहाचे २० हजार रुपये देण्यात आले. प्रत्यक्षात त्यांच्या नावे ४१ हजार ५२० रुपयांचा धनादेश देऊन त्यांच्याकडून इतर खर्चदेखील याच रकमेतून  दाखविण्यात आले आहेत.खर्चासंदर्भात माहिती घेईन : बीडिओवैभववाडी पंचायत समितीचा कार्यभार आपण आताच स्वीकारला आहे. सध्या मी एका कामासाठी दुसरीकडे आहे. परंतु आल्यानंतर या खर्चासंदर्भात माहिती घेईन आणि योग्य तो निर्णय घेईन, असे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी विद्या गमरे यांनी सांगितले.खर्चाची खातरजमा करू : सभापतीप्रशिक्षणावर नेमका किती आणि कसा खर्च झाला याची माहिती घेऊन त्याची खातरजमा केली जाईल. जर चुकीच्या पद्धतीने खर्च झाला असेल तर त्यासंदर्भात नक्कीच ती बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून दिली जाईल, असे सभापती अक्षता डाफळे यांनी यावेळी सांगितले.कुणालाही पाठीशी घालणार नाही : रावराणेसरपंच आणि ग्रामसेवक प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमावर झालेल्या खर्चात घोळ असेल तर त्याबाबतीत शहानिशा करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य लक्ष्मण रावराणे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्गvaibhavwadiवैभववाडी