शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोरोना संवेदनशील यादीतून गोव्याचे नाव वगळा; गोव्याच्या मुख्यमंत्र्याकडून  महाराष्ट्र सरकारला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 23:44 IST

लाॅकडाऊन महाराष्ट्रात धडकी गोव्याला. गोव्यात सध्या कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.सध्या तरी गोव्याने कडक लॉकडाउनचा मार्ग स्वीकारला नाही.पण काहि सार्वजनिक कार्यक्रमावर मात्र बंधने आणली आहेत.तसेच गोव्याचा पर्यटन हंगाम मात्र सुरळित सुरू असल्याचा दिसून येत आहे.

 

- अनंत जाधवसावंतवाडी :  ब्रेक द चेन अंर्तगत कोरोना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार विविध स्तरावर कडक पाउले उचलत असतनाच कोरोना बाबत संवेदनशील राज्याची घोषणा केली असून,त्यात गोव्याचा समावेश आहे.गोव्यातून येणाºयाची कोरोना चाचणी बंधणकारक केल्याने महाराष्ट्रात जरी संचारबंदी असली तरी त्यांची धडकी मात्र गोव्याला भरली आहे.गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकतेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याना पत्र पाठवून  संवेदनशील राज्याच्या यादीतून गोव्याचे नाव वगळण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राच्या बंधनामुळे गोव्याच्या पर्यटना बरोबरच इतर बाबतीही मोठा परिणाम होण्याची भिती व्यकत होत आहे.

ब्रेक द चेन अंर्तगत कोरोना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार विविध स्तरावर उपाय योजना आखत आहेत.त्यातच महाराष्ट्राने गोव्यासह केरळ राजस्थान, दिल्ली उत्तराखंड व एनसीआर या राज्यातून महाराष्ट्रात येणाºया प्रत्येकांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. ही सर्व राज्ये कोरोना बाबत संवेदनशील असल्याने ही बंदी घातली आहे. याचा मोठा फटका गोव्याला बसला आहे.कारण सध्या अंतरराष्ट्रीय विमानातून येणारा पर्यटक कमी झाला आहे.त्यामुळे गोव्याचे पर्यटन हे देशी पर्यटकांवरच अवलबून आहे.जर महाराष्ट्राने सिमेवर कडक निर्बध आखले तर त्याचा मोठा तोटा गोव्याला सहन करावा लागणार आहे.

त्या शिवाय गोव्यात नोकरीसाठी जाणारे सिंधुदुर्ग मधील अनेक जण आहेत.यात युवक युवती बरोबरच अनेक तरूण ही नोेकरीला जातात जर हे सर्व जण तेथे नोकरीला गेले नाही तर त्या कंपन्याचे ही नुकसान होईल च त्या शिवाय येथील युवक युवतीचा रोजगाराचा प्रश्न ही मोठा निर्माण होईल पण महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या बाबतीत कडक धोरण स्वीकारले आहे.कोणत्या ही प्रकारची हालगर्जाेपणा सरकारला नको आहे. त्यामुळे सर्व सिमवर कडक आरोग्य तपासणी करण्याबाबत सरकार कडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

पण गोव्यासाठी हे कडक निर्बध धोक्याचे आहेत.गोव्याची अर्थव्यवस्थाच ठप्प होईल अशी भिती गोवा सरकारला वाटत असून,त्यामुळे गोव्या च्या मुख्यमंत्र्यानी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहले आहे.या पत्रात कडक निर्बंधाच्या यादीतून गोवा सरकारचे नाव हटवावे असे आवाहन सावंत यांनी केले आहे.याबाबत अद्याप महाराष्ट्र सरकारने कोणती भूमिका घेतली नाही.मात्र यावर लवकरात लवकर भुमिका घेतली नाही तर त्यांचा तोटा महाराष्ट्राला ही बसू शकतो अशी शक्यता ही वर्तवली जात आहे.

गोव्यात सध्या कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.सध्या तरी गोव्याने कडक लॉकडाउनचा मार्ग स्वीकारला नाही.पण काहि सार्वजनिक कार्यक्रमावर मात्र बंधने आणली आहेत.तसेच गोव्याचा पर्यटन हंगाम मात्र सुरळित सुरू असल्याचा दिसून येत आहे.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतcorona virusकोरोना वायरस बातम्या