शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे वर्षांचा इतिहास असलेली गोकुळाष्टमी साजरी कासार्डेतील एकत्रित राणे कुटुंबाचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 22:35 IST

तळेरे : कणकवली तालुक्यातील कासार्डे साटमवाडीतील एकत्रित राणे कुटुंबातील गोकुळाष्टमीला सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास आहे. विशेष म्हणजे यानिमित्त खेळण्यात येणाऱ्या आगळ्यावेगळ्या खेळात अनेकांचे कसब लागते. गेल्या दोनशे वर्षांपासून वेगळ्या पद्धतीने अत्यंत धार्मिक वातावरणात अखंडित गोपाळकाला व गोकुळाष्टमी साजरी केली जात असल्याचे राणे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. यात अनेकजण सहभागही घेतात आणि ...

ठळक मुद्देविविध धार्मिक कार्यक्रम; ग्रामस्थांचाही सहभाग, तीन पिढ्यांचा अनोखा उत्सव

तळेरे : कणकवली तालुक्यातील कासार्डे साटमवाडीतील एकत्रित राणे कुटुंबातील गोकुळाष्टमीला सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास आहे. विशेष म्हणजे यानिमित्त खेळण्यात येणाऱ्या आगळ्यावेगळ्या खेळात अनेकांचे कसब लागते. गेल्या दोनशे वर्षांपासून वेगळ्या पद्धतीने अत्यंत धार्मिक वातावरणात अखंडित गोपाळकाला व गोकुळाष्टमी साजरी केली जात असल्याचे राणे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. यात अनेकजण सहभागही घेतात आणि गोपाळकाल्याचा आनंद लुटतात. दुपारी सुरू होणारा हा उत्सव सायंकाळपर्यंत चालतो. दिवसेंदिवस हा आगळावेगळा उत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतून असंख्य लोक येत असतात.

श्रावण महिना म्हणजे अनेक सण व उत्सवांची अक्षरश: मांदियाळीच असते. अलीकडे शहरी भागासह ग्रामीण भागातही दहीहंड्यांमध्ये स्पर्धा निर्माण होत असतानाच कासार्डेसारख्या गावात अशाप्रकारचा आगळावेगळा गोपाळकाला दोनशे वर्षांपासून अखंडपणे साजरा केला जात आहे.

अलीकडे राणे कुटुंबीयांसह गावातील अनेकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचेही दिसून येते. सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास असलेला हा सण मोठ्या आनंदात व उत्साहात पार पाडण्यासाठी राणे कुटुंबीय धार्मिक भावनेने सहभागी होतात.याबाबतची माहिती देताना ते म्हणाले की, राणे कुटुंबातील राजबा राणे या मूळ पुरुषाने सुमारे दोनशे वर्षांपूर्वी या उत्सवाला सुरुवात केली. त्यापासून आजतागायत अव्याहतपणे हा उत्सव मोठ्या धार्मिक वातावरणात साजरा होत आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी सकाळी बाळकृष्ण आणि संपूर्ण गोकुळ कासार्डे साटमवाडी येथील राणे यांच्या मूळ घरात सवाद्य आणले जाते. त्यानंतर विधिवत पूजा करून रात्री १२ वाजता बाळकृष्णाला पाळण्यात घातले जाते आणि जन्माष्टमी साजरी केली जाते. श्रावण महिन्यातील धार्मिक ग्रंथ वाचन, भजन, नवस बोलणे व फेडणे, प्रसाद वाटप व त्यानंतर महिलांच्या फुगड्यांचा कार्यक्रम रंगत जातो. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात.

गोकुळाष्टमीच्या दुसºया दिवशी गोपाळकाल्याला सुरुवात होते. यावेळी खेळल्या जाणाºया दहीहंडी या उत्सवाचे अनेकांना आकर्षण असते. कृष्णाच्या मूर्तिसमोर दहीहंडी सजवली जाते. यावेळी अनेकजण नवस बोलतात. राणे कुटुंबाच्या अंगणात सहा फूट अंतराने दोन खांब पुरतात. त्याभोवती रांगोळी घालून ढोलताशांच्या गजरात खांबाभोवती गोल रिंगण करून भजन म्हटले जाते. यावेळी वातावरण धार्मिक बनलेले असते. यावेळी असंख्य भाविक उपस्थित असतात. यानंतर खºया अर्थाने दहीहंडी साजरी होते. दरवर्षी हा खेळ आणि दहीहंडी पहायला असंख्य भाविक उपस्थित असतात. विशेष म्हणजे या उत्सवात वयोवृद्ध भाविकांचाही सहभाग असतो.

इतर दहीहंड्यांप्रमाणे मानवी मनोरे न उभारता ज्येष्ठ व्यक्तीला वर उडविले जाते. त्याच्या हातात असलेल्या सुरीने ही हंडी फोडायची असते. जोपर्यंत हंडी फोडत नाही तोपर्यंत त्याला वरती उडविले जाते आणि खालचे सर्वजण त्याला झेलतात. त्यानंतर अनेकांचे कसब पणाला लावणारा खेळ खेळला जातो. उपस्थित काहीजण त्या खांबाभोवती अक्षरश: झोपून खांब घट्ट पकडून ठेवतात. तर काहीजण तो खांब काढण्याचा प्रयत्न करतात.

यादरम्यान खूप मजा येते. दोन्हीही गट आपली ताकद लावत असतात. हा खेळ सुमारे दीड ते दोन तास चालतो. अशा खेळाद्वारे दहीहंडीसाठी उभारलेले दोन्हीही खांब काढल्यानंतर श्रीकृष्णाचे विसर्जन केले जाते. अलीकडच्या काही वर्षात कासार्डेसह परिसरातील अनेकजण ही दहीहंडी पाहण्यासाठी गर्दी करतात. रात्री महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होते.तीन पिढ्यांचा अनोखा उत्सवया उत्सवामध्ये लहान मुले, तरुण पिढी आणि वयोवृद्धांचा मोठ्या संख्येने सहभाग होतो. एकप्रकारे तीन पिढ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असलेला दिसून आला. तर गावातील सर्व वयोगटातील ग्रामस्थ या उत्सवामध्ये सहभागी झाले होते. दरवर्षी या उत्सवाला येणाºया भाविकांची संख्या वाढलेली पहावयास मिळते.कासार्डे साटमवाडी येथे राणे कुटुंबीयांची अनोख्या पध्दतीने साजरी करण्यात येणारी दहीहंडी अनेकांचे आकर्षण ठरत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDahi Handiदही हंडी