शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर तळेरे-कोल्हापूर महामार्ग सुरू, मुक्काम ठोकलेल्या वाहनांचे मार्गक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 18:56 IST

अतिवृष्टीमुळे बंद झालेला तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल अकराव्या दिवशी सुरू झाला आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून या मार्गावर अवजड वाहने धावू लागल्याने वाहन चालकांसह व्यापाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत जिल्ह्यातील जनजीवन सुरळीत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

ठळक मुद्देअखेर तळेरे-कोल्हापूर महामार्ग सुरूमुक्काम ठोकलेल्या वाहनांचे मार्गक्रमण

वैभववाडी : अतिवृष्टीमुळे बंद झालेला तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल अकराव्या दिवशी सुरू झाला आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून या मार्गावर अवजड वाहने धावू लागल्याने वाहन चालकांसह व्यापाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत जिल्ह्यातील जनजीवन सुरळीत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.पंचगंगेच्या पुराची पातळी वाढल्याने १ आॅगस्टच्या रात्रीपासून प्रशासनाने बालिंगा (कोल्हापूर) पुलावरून अवजड वाहनांना बंदी घातली होती. त्याच दरम्यान गगनबावडा ते कोल्हापूर दरम्यान मांडकुली, किरवे, लोंघे येथे पुराचे पाणी रस्त्यावर आले होते. मात्र, ४ आॅगस्टला दुपारी २-३ तासच हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला होता. त्यानंतरच्या अतिवृष्टीमुळे महापुराने रौद्र रुप धारण केले होते.कोल्हापूरला महापुराचा विळखा पडल्याने काही दिवस सिंधुदुर्गचा कोल्हापूरशी संपर्क पूर्णपणे तुटला होता. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे परिसरात जाणाऱ्या अवजड वाहनांनी तळेरे-कोल्हापूर मार्ग सुरू होण्याच्या प्रतीक्षेत वैभववाडीत मुक्काम ठोकला होता.

मंगळवारी सकाळी कोल्हापूरहून गगनबावडामार्गे अवजड वाहने वैभववाडीत पोहोचत गेल्या ८-९ दिवसांपासून वैभववाडीत मुक्काम ठोकलेल्या वाहनांनी कोल्हापूरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. गगनबावडा कोल्हापूर मार्ग सुरू झाल्यामुळे व्यापारी सुखावले आहेत.

टॅग्स :state transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग