शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: तेलीच्या मागणीनंतर तरी केसरकरांनी राजीनामा द्यावा, रूपेश राऊळ यांची मागणी 

By अनंत खं.जाधव | Updated: July 8, 2024 17:28 IST

अपयशी मंत्री असल्याची टीका

सावंतवाडी : मित्रपक्षात असलेल्या राजन तेलींनी शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना शिक्षण खात्यातले काही कळत नाही, त्यामुळे त्यांना मंत्रीपदावरुन काढून टाकावे, अशी मागणी करुन त्यांना जोरदार चपराक दिली आहे. त्यामुळे केवळ नैतिकता म्हणून तरी केसरकरांनी आता तरी आपल्या शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून केली आहे. दरम्यान, काल झालेल्या मुसळधार पावसात अनेकांचे नुकसान झाले. मात्र केसरकर मतदार संघात असताना सुध्दा त्यांनी नुकसान झालेल्यांची साधी विचारपुस सुध्दा केली नाही. तर दुसरीकडे त्यांचा वचक नसल्यामुळे आपती व्यवस्थापन यंत्रणा कुचकामी ठरली आहे, अशी टीका राऊळ यांनी केली.राजन तेली यांनी मंत्री केसरकरांची हकालपट्टी करा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर  राऊळ यांनी टिका करतना केसरकर यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी न करता महायुतीतील नेते करत आहेत यावरून केसरकर यांची नैतिकता कळली आहे असेही राऊळ म्हणाले.दरवर्षी पावसाळ्यामध्ये पुराचा फटका सावंतवाडी तालुक्याला बसतो यामध्ये बांदा परिसर व बाजारपेठ व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात बसतो. मात्र प्रशासन, शासन यंत्रणा याबाबत कायमस्वरूपी मार्ग काढण्यास कुचकामी ठरली आहे. दुकानदारांचे मोठे नुकसान होते. तसेच सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यात नुकसान होते. तेव्हा केसरकर यांनी हे करू, ते करू असे म्हटले. मात्र काहीच केले नाही.

ते मुंबईचे निवासी झाले आहेत. आतापर्यंत अनेक आश्वासने, घोषणा केसरकर यांनी केल्या. शिक्षणमंत्री असतानाही डीएड बीएड तरुणांना वाऱ्यावर सोडून दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीडशेहून शाळा नादुरुस्त आहेत. विद्यार्थी पाणी गळत असलेल्या वर्गामध्ये बसत आहेत. फक्त घोषणा, खोट्या आशेवर लोकांना भूलभुलैया करत आहेत अशी टीका ही राऊळ यांनी केली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणDeepak Kesarkarदीपक केसरकर