शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण दिन विशेष: पर्यावरण संरक्षणासाठी लढा उभारूया; पर्यावरणाची हानी भावी पिढीसाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:28 IST

पर्यावरणातील प्रदूषणामुळे मागील काही दशकात मानवी जीवन व निसर्ग अस्वस्थ

महादेव भिसेआंबोली : गेल्या काही दशकांमध्ये पर्यावरणाची हानी झाली आहे. भावी पिढीसाठी ती धोक्याची घंटा आहे. त्यामुळे योग्यवेळी शहाणे होऊन प्रत्येकाने पर्यावरण या विषयाला प्रथम प्राधान्य देऊन नंतरच इतर विषय शिकले पाहिजे. पर्यावरण टिकण्यासाठी झटले पाहिजे. पर्यावरण संरक्षण म्हणजे पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे. यात हवा, पाणी, जमीन आणि जीवाणूंचा समावेश होतो. आपण पर्यावरण संरक्षणासाठी अनेक सोप्या उपाययोजना केल्यास पर्यावरणाची काळजी घेऊ शकतो.पर्यावरण म्हणजे हवा, पाणी, वृक्ष, माणूस, इतर वन्य प्राणी, आपल्या सभोवताली असलेले अनेक प्रकारचे वायू, निर्जीव घटक या सर्वांनी मिळून बनलेले वातावरण. परंतु, गेल्या अनेक वर्षांमध्ये मानवाचा चुकीच्या पद्धतीने झालेला हस्तक्षेप हा पर्यावरणाला घातक ठरू लागला आहे.आपले जीवन हे स्वच्छ आणि संतुलित पर्यावरणावर अवलंबून आहे. पर्यावरणातील प्रदूषणामुळे मागील काही दशकात मानवी जीवन व निसर्ग अस्वस्थ झालेला आहे.

वन्यप्राण्यांसमवेत निर्जीव घटकांचेही संवर्धन हवेअगदी खाल्लेल्या चॉकलेटचा कागदसुद्धा खिशामध्ये ठेवून तो कचराकुंडीत टाकण्याइतकी जनजागृती येणाऱ्या पिढीमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड असेल, नदी संवर्धन असेल, वन्य प्राणी संवर्धन असेल, इतकेच कशाला तर निर्जीव घटकांचे संवर्धनही तितकेच गरजेचे आहे. तरच पर्यावरणाचा समतोल राहू शकतो, अन्यथा हा समतोल ढासळून निसर्गाच्या पर्यावरणाच्या क्रोधाला सामोरे जावेच लागणार आहे. पूर, वादळवारा, भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक अशा प्रकारचे निसर्गाचे रौद्ररूप आपल्याला भविष्यात बघावे लागेल. - प्रशांत जाधव, वन्यप्राणी छायाचित्रकार व पर्यावरण अभ्यासक, कोल्हापूर

नागरिकांमध्ये जनजागृती हवीजास्तीत जास्त झाडे लावली गेली पाहिजेत. पाणी योग्य पद्धतीने वापरले गेले पाहिजे, ते साठवले गेले पाहिजे, प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. अनावश्यक ऊर्जा म्हणजेच वीज वापरण्यावरही बंधन पाहिजे. पर्यावरणाविषयी प्रत्येक नागरिकामध्ये जनजागृती कशी निर्माण होईल, यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत.  - राकेश देऊलकर,  पर्यावरण अभ्यासक

प्रदूषणकारी प्रकल्पांना बंदी हवीवाढते प्रदूषणकारी प्रकल्प यावर कायदेशीर बंधन आणणे गरजेचे आहे. अनधिकृत प्रदूषणकारी प्रकल्प बंद केले गेले पाहिजेत, जे प्रकल्प नदी प्रदूषित करत आहेत. त्या प्रकल्पांवर कारवाई करणे गरजेचे आहे. वृक्षतोड थांबवली गेली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संरक्षणासाठी पुढे येऊन कोणते ना कोणते पाऊल उचलून पर्यावरण संवर्धनास मदत केली पाहिजे.  - रोहन कोरगावकर, पर्यावरण अभ्यासक, मुंबई (लालबाग)

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गenvironmentपर्यावरण