शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

Sindhudurg: महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात घुसखोरी, कर्नाटक मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर ताब्यात 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 19, 2024 13:31 IST

तारकर्ली येथे मत्स्यविभागाची कारवाई

मालवण : सागरी किनारपट्टीवरील मालवण तारकर्ली समोर महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात घुसखोरी करून अवैध मासेमारी करणाऱ्या कर्नाटक मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर मत्स्य विभागाने शनिवारी पहाटे कारवाई करत ताब्यात घेतला आहे.पापलेट, सौदाळा, बांगडा, सुरमई, कट्टर, बळा, कटल यांसह अन्य मासे ट्रॉलर मध्ये मोठया प्रमाणात असून त्याचा पंचनामा करून पुढील कारवाईसाठी हायस्पीड ट्रॉलर सर्जेकोट जेटी येथे आणण्यात आला आहे.मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, आज, शनिवारी (दि १९) सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग-मालवण सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री सागरी गस्ती दरम्यान परवाना अधिकारी मालवण मुरारी भालेकर सोबत सहकारी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक/ रक्षक दीपेश मायबा, सागर परब, मिमोह जाधव, राजेश कुबल, प्रणित मुणगेकर, स्वप्नील सावजी, पोलिस कॉन्स्टेबल व्ही. व्ही. पाटोळे यांनी कर्नाटक- मलपी येथील नौका वायुपुत्र-२ क्रमांक IND-KA-०२-MM-५८१२ महाराष्ट्र राज्याच्या जलाधी क्षेत्रात अवैध मासेमारी करताना पकडण्यात आली आहे. नौका मालकाविरुद्ध महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मच्छिमार संतप्तमालवण सागरी किनारपट्टी भागात कर्नाटक मलपी तसेच अन्य राज्यातील हायस्पीड ट्रॉलर गेले काही दिवस सातत्याने मोठ्या संख्येने घुसखोरी करून रात्रीच्यावेळी मासळीची लूट करतात. स्थानिक मच्छिमारांची जाळी तोडून नुकसान करतात. असे असताना एका ट्रॉलरवर कारवाई नको तरी अधिक कारवाई झाली पाहिजे. तसेच पकडलेल्या हायस्पीड ट्रॉलरवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भुमिका मांडली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनाराFishermanमच्छीमार