शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीत स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण, ४८ तासांत झोपड्या काढण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 15:30 IST

येत्या ४८ तासांत संबंधितांनी आपल्या झोपड्या काढून टाकाव्यात. अन्यथा प्रशासन पोलीस बंदोबस्तात त्या झोपड्या काढून टाकेल, असे लेखी आश्वासन दिल्याने वस्तीतील सुमारे पंचवीस ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले.

ठळक मुद्देआंबोलीत स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण, ४८ तासांत झोपड्या काढण्याचे आदेश प्रांताधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मागे

सावंतवाडी : आंबोली जाधव वाडीतील स्मशानभूमीच्या जागेवर बाहेरील लोकांनी येऊन अतिक्रमण केले व त्याठिकाणी झोपड्या उभारल्या. त्या झोपड्यांना ग्रामपंचायतीने घर नंबर दिले. याबाबत दलित वस्तीतील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या कार्यालयासमोर उपोषण छेडले. अखेर प्रांताधिकारी खांडेकर यांनी येत्या ४८ तासांत संबंधितांनी आपल्या झोपड्या काढून टाकाव्यात. अन्यथा प्रशासन पोलीस बंदोबस्तात त्या झोपड्या काढून टाकेल, असे लेखी आश्वासन दिल्याने वस्तीतील सुमारे पंचवीस ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले.आंबोली हिरण्यकेशीजवळील हरिजनवस्तीच्या राखीव स्मशानभूमीच्या जागेवर काही बाहेरील व्यक्तींनी अनधिकृतपणे सिमेंटच्या मेढी उभारून पत्रे घालून त्यांना ग्रामपंचायतीकडून नंबर घेतले होते.ही जागा शासन दरबारी नोंद असताना अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणाऱ्या ग्रामपंचायतीवर व झोपड्या बांधणाऱ्या संबंधितांवर कारवाई करून आपली जागा खाली करून मिळावी यासाठी वाडीतील ग्रामस्थांनी उपोषण छेडले होते.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सगुण जाधव, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष लाडू जाधव, दशरथ जाधव, गोविंद जाधव, अनंत जाधव, प्रकाश जाधव, केशव जाधव, मनोहर जाधव, पांडुरंग जाधव, बाळकृष्ण जाधव, अजय जाधव, एकनाथ जाधव, विश्राम जाधव, यशवंत जाधव, योगेश जाधव, पार्वती जाधव, जगन्नाथ जाधव, प्रसाद जाधव, शशिकांत जाधव, भरत जाधव आदी उपस्थित होते.यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी ४८ तासांच्या मुदतीत संबंधित ठिकाणी जेसीबी लावून जागा ताब्यात देण्यात येईल. संबंधित व्यक्ती व ग्रामपंचायत यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी वंचित बहुजनचे महेश परुळेकर यांनी ग्रामपंचायतीवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा. कारवाई न झाल्यास सोमवारी आपण त्या आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले. कारवाई का करण्यात आली नाही? असे विचारले. 

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग