शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
4
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
5
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
6
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
7
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
8
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
9
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
10
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
11
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
12
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
13
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
14
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
15
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
17
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
18
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
19
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
20
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू

गणरायाला भावपूर्ण निरोप

By admin | Updated: September 26, 2016 23:20 IST

२१ दिवसांच्या गणरायांचे विसर्जन : फटाक्यांची आतषबाजी; भक्तीमय वातावरण

कणकवली : कणकवली शहरातील आॅटो रिक्षा चालक-मालक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह जिल्ह्यात ठिकठिकाणी रविवारी २१ दिवसांच्या गणरायांना ढोलताशांच्या गजरात जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. जिल्ह्यातील सुमारे ५२७ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ५ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला होता. प्रत्येकाच्या रुढी, परंपरेप्रमाणे दीड, पाच, सात, अकरा, सतरा, एकोणीस अशा विविध दिवशी गणरायांना निरोप देण्यात आला. तर काही ठिकाणी गौरी, गणपतींचे विसर्जन एकत्रित करण्यात आले.काही घरगुती तर काही सार्वजनिक मंडळांच्या गणरायांना रविवारी २१ दिवसांनी निरोप देण्यात आला. यामध्ये कणकवलीतील आॅटो रिक्षा चालक-मालक संघटनेच्या सार्वजनिक गणपतीचा समावेश होता.ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीने या गणरायाला जानवली नदीवरील गणपती सान्यावर रात्री उशिरा निरोप देण्यात आला. या विसर्जन मिरवणुकीत तालुक्यातील रिक्षा चालक बहुसंख्येने सहभागी झाले होते. मुणगे येथे बाप्पाचा जयघोषकुणकेश्वर : फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोलताशांच्या गजरात व ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री देवी भगवती देवस्थानच्या बाप्पाला मोठ्या भक्तीभावात निरोप देण्यात आला.दुपारी धार्मिक विधी पार पडल्यानंतर झेंडूच्या फुलांची आकर्षक आरास मांडलेल्या गाडीत बाप्पाला विराजमान करण्यात आले. सतत चार-पाच दिवस पडणाऱ्या पावसाने उसंत घेतल्याने गणेशभक्तांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता. मिरवणुकीमध्ये तरुण मंडळींबरोबरच प्रौढही ढोलताशांचा ठेका धरताना दिसत होते. महिलावर्गाचाही विशेष सहभाग दिसून येत होता. विसर्जनाच्या मार्गातील प्रत्येक वाडीमध्ये ‘श्रीं’च्या मिरवणुकीचे स्वागत जल्लोषात केले जात होते. गणेशभक्तांसाठी सरबत व अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. तब्बल पाच तास चाललेल्या मिरवणुकीनंतर मुणगे आडवळवाडी समुद्रकिनारी गणरायाचे विसर्जन करण्यात आले. २१ दिवसांचा गणेशोत्सव शांततापूर्ण वातावरणात पार पडल्याने देवस्थान ट्रस्टने आभार व्यक्त केले. जिल्ह्यात सर्वत्र अशाचप्रकारचे वातावरण विसर्जनाच्यावेळी दिसून येत होते. (प्रतिनिधी)डबलबारीने रंगत : रसिकांची उत्स्फूर्त दाद आॅटो रिक्षा चालक-मालक संघटनेच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी शुक्रवारी रात्री डबलबारी भजनाच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. बुवा श्रीकांत शिरसाट व बुवा अरुण घाडी यांच्यात हा सामना झाला. श्रीकांत शिरसाट यांना राजू सावंत तर अरुण घाडी यांना विराज बावकर यांनी पखवाज साथ केली. पहाटे ३ वाजेपर्यंत सुरु असलेल्या या डबलबारी भजनाच्या सामन्यात दोन्ही बुवांनी आपल्या विशिष्ट शैलीत गायन करून रंगत आणली. दोन्ही बुवांनी परमहंस भालचंद्र महाराज यांच्या जीवनावरील सादर केलेल्या गजराला भजन रसिकांनी विशेष दाद दिली.