शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालीन बैठकीत वीजवितरण, बांधकाम विभागावर नागरिकांनी व्यक्त केला रोष

By अनंत खं.जाधव | Updated: July 24, 2023 15:46 IST

सावंतवाडी : सावंतवाडीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आपत्कालीन बैठक पार पडली. या बैठकीत येवून नागरिकांनी विद्युत ...

सावंतवाडी : सावंतवाडीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आपत्कालीन बैठक पार पडली. या बैठकीत येवून नागरिकांनी विद्युत विभागासह बांधकाम विभागावर आपला रोष व्यक्त केला. त्यावर केसरकर यांनी अधिकाऱ्यांनी गावात जाऊन पाहाणी करावी आणि त्याच्या समस्या सोडवाव्यात अशा सुचना केल्या.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची आपत्कालीन बैठक काल, रविवारी उशिरा मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत सावंतवाडीत पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्षमी, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपवनसंरक्षक एस.एन.रेड्डी, निवासी जिल्हाधिकारी मच्छीद्र सुकटे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार श्रीधर पाटील, आपत्कालीनच्या राजश्री सामंत, सचिन वालावलकर, जिल्हाप्रमुख संजय आग्रे, अशोक दळवी, बबन राणे, गणेशप्रसाद गवस आदी उपस्थित होते.जिल्ह्यात गत वर्षीच्या तुलनेत यावेळी दमदार पाऊस झाला. मात्र प्रशासनाकडून योग्य ती दक्षता घेतल्याने लोकांना चांगल्या सुविधा मिळाल्या आहेत. मात्र प्रशासनाने अजून ही चांगले काम केले पाहिजे. ज्या ठिकाणी खरोखरच आपत्ती येईल तिथे लोकांमध्ये जागृती करावी. शाळा रिकामी करून त्याना राहण्याची व्यवस्था करावी असे केसरकर यांनी सांगितले. यावेळी नागरिकांनी बैठकीत येवून विद्युत विभागावर आपली नाराजी व्यक्त केली. बांदाचे सरपंच प्रियंका नाईक यांनी तर गावात विजेची समस्या असताना त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. ओटवणे येथे विद्युत वाहिनी पडून मुलाचा मृत्यू झाला तसेच अनेक गावात वीज वाहिनी पडून गुरे दगावली अश्या तक्रारी केल्या. यावर मंत्री केसरकर यांनी विद्युत विभागाने गावात जाऊन स्वत: पाहणी करावी अशी सुचना केली.आंबोली घाटात दरड कोसळली ती काढण्यासाठी बारा तास लागले. याबाबत सर्वगौड यांनी जेसीबी चालक दरड काढण्यास घाबरत होता असे उत्तर दिले. तर मंत्री केसरकर यांनी सावंतवाडी दोडामार्ग मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने रस्ते खराब होतील यावर उपाय योजना कराव्यात अशी सुचना केली. तसेच बांदा तसेच ओटवणे आंबोली चौकुळ येथे कायमस्वरूपी एक होडी ठेवण्यात यावी अशी सुचना महसूल प्रशासनास केली तसेच पूर परस्थीतीच्या पाश्र्वभूमीवर बांदा येथे एक निवारा शेड उभी राहिल्यास दुकान दाराच्या सामानाचे नुकसान होणार नसल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक घराचे नुकसान सिंधुदुर्ग जिल्ह्यात 159 घराचे अतिवृष्टीत नुकसान झाले आहे.यातील 110 घरे ही सावंतवाडी तालुक्यातील असल्याचे प्रशासनासाकडून सांगण्यात आले.केसरकर स्वत: आर्थिक मदत देणारसावंतवाडी तालुक्यात जी घरे कोसळून नुकसान झाले आहे या घरांना प्रशासन मदत देणार आहे. मात्र माझ्याकडून ही थोडी फार नुकसान भरपाई दिली जाईल असे मंत्री केसरकर म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDipak Kesarkarदीपक केसरकर