शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

जिल्हा रुग्णालयात लाखोंचा अपहार, परशुराम उपरकरांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 4:26 PM

कोरोनाच्या काळात जिल्हा रुग्णालयाकडून रुग्णांसाठी खरेदी केलेल्या विविध साहित्यात लाखो रुपयांचा अपहार झाला आहे.

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयात लाखोंचा अपहार, परशुराम उपरकरांचा आरोपमाहितीच्या अधिकाराखाली माहिती मागविण्याचा इशारा

कणकवली : कोरोनाच्या काळात जिल्हा रुग्णालयाकडून रुग्णांसाठी खरेदी केलेल्या विविध साहित्यात लाखो रुपयांचा अपहार झाला आहे. यात तीन हजार रुपयांना मिळणारी थर्मल गन दहा हजार रुपये तर दोन हजाराला मिळणारा पल्स आॅक्सीमीटर पाच हजार रुपयाने खरेदी केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेऊन उघड करणार आहे, असा इशारा मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाकडे सध्या कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते देण्यासाठी पैसा नसताना कोविडसाठी प्राप्त झालेल्या निधीची उधळपट्टी करून अनावश्यक व निकृष्ट दर्जाच्या वस्तू खरेदी करण्याचे काम जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक व त्यांचे भांडारपाल यांच्यामार्फत सुरू आहे.

मार्च २०२० पासून कोविडपासून आलेल्या निधीतून खासगी पुरवठादाराकडून साहित्य खरेदी करीत असताना चढ्या दराची दरपत्रके एकाच पुरवठादाराकडून प्राप्त करून घेऊन अनावश्यक खरेदी करून मोठ्या प्रमाणात भष्टाचार करण्याचे कार्य वरिष्ठ अधिकारी करीत आहेत.सावंतवाडी व कणकवली येथे उपजिल्हा रुग्णालयात सर्व शस्त्रक्रिया होत असतील तर त्यांच्या आॅपरेशन थिएटरसाठी लागणऱ्यांया आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्या अपुऱ्या  पडत असल्याने कोविड रुग्णाव्यतिरिक्त असलेल्या रुग्णांवर उपचार देणे डॉक्टरांना कठीण होत आहे, असेही उपरकर यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.सर्व प्रकारची माहिती प्राप्त करून घेणारयेथील कामाचा भार कमी करण्यासाठी रुग्णांना जिल्हा रुग्णालय येथे पाठविले जावे. परंतु, तसे होताना दिसत नाही. म्हणूनच सर्व प्रकारची माहिती प्राप्त करून घेण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी त्या संबंधीची तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे व शासनाच्या सचिवांकडे करणार असल्याचे उपरकर यांनी  म्हटले आहे .

टॅग्स :hospitalहॉस्पिटलsindhudurgसिंधुदुर्ग