शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ओटवणेतील ग्रामस्थांकडून वीज अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 17:00 IST

वीज वितरण कंपनीकडून आकारण्यात आलेल्या अव्वाच्या सव्वा वाढीव वीज बिलांसह ओटवणे गावातील वीज समस्यांबाबत ओटवणे ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले. सावंतवाडीत वीज अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांनी याबाबत जाब विचारला. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी विजेच्या समस्यांचा पाढाच वाचला. वीज मीटरचे अचूक रिडींग न घेता काढलेल्या भरमसाठ वीज बिलांबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

ठळक मुद्देओटवणेतील ग्रामस्थांकडून वीज अधिकारी धारेवरवाढीव बिलाची समस्या : सावंतवाडी कार्यालयावर धडक देत घातला घेराव

सावंतवाडी : वीज वितरण कंपनीकडून आकारण्यात आलेल्या अव्वाच्या सव्वा वाढीव वीज बिलांसह ओटवणे गावातील वीज समस्यांबाबत ओटवणे ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले. सावंतवाडीत वीज अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांनी याबाबत जाब विचारला. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी विजेच्या समस्यांचा पाढाच वाचला. वीज मीटरचे अचूक रिडींग न घेता काढलेल्या भरमसाठ वीज बिलांबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.सोमवारी ओटवणे येथील ग्रामस्थ सावंतवाडीतील वीज वितरणच्या कार्यालयात आले. त्यांनी उपस्थित अधिकाºयांवर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी त्यांनी निवेदनही दिले.यावेळी सरपंच उत्कर्षा गावकर, उपसरपंच उज्ज्वला बुराण, माजी उपसरपंच बाबाजी गावकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नमाला गावकर, महेश चव्हाण, धाकू बोर्ये, प्रमोद गावकर, उमेश गावकर, संजय कविटकर, सिद्धेश गावकर, बाबा मळेकर, दशरथ गावकर, सदाशिव गावकर, बाळकृष्ण भगत, साक्षी कविटकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून अखेर बुधवार १२ आॅगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता ओटवणे ग्रामपंचायत कार्यालयात वीज कर्मचारी पाठवून वाढीव बिले कमी करण्याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही वीज उपअभियंता यादव यांच्या आदेशानुसार धोत्रे यांनी दिली. ओटवणे गावातील वीज समस्या सोडविण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्ग