वीज बिल पताका आंदोलन, पर्यटन व्यावसायिक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 01:00 PM2021-01-30T13:00:18+5:302021-01-30T13:01:52+5:30

Mahavitran Malvan Sindhudurg- तारकर्ली पर्यटन विकास संस्थेमार्फत मालवण येथील महावितरण कार्यालयासमोर वीज बिल पताका आंदोलन छेडण्यात आले. यावेळी वीज बिल माफ झालेच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, पर्यटन व्यावसायिकांच्या एकजुटीचा विजय असो, अशी घोषणाबाजी केली.

Electricity bill flag movement, tourism business aggressive | वीज बिल पताका आंदोलन, पर्यटन व्यावसायिक आक्रमक

वीज बिल पताका आंदोलन, पर्यटन व्यावसायिक आक्रमक

googlenewsNext
ठळक मुद्देवीज बिल पताका आंदोलन, पर्यटन व्यावसायिक आक्रमक आठ दिवसांत मान्य न झाल्यास ठिय्या

मालवण : तारकर्ली पर्यटन विकास संस्थेमार्फत मालवण येथील महावितरण कार्यालयासमोर वीज बिल पताका आंदोलन छेडण्यात आले. यावेळी वीज बिल माफ झालेच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, पर्यटन व्यावसायिकांच्या एकजुटीचा विजय असो, अशी घोषणाबाजी केली.

लॉकडाऊननंतरच्या कालावधीनंतर पुढील सहा महिने वीज बिलांमध्ये शासनाने ५० टक्के सूट द्यावी, अशी मागणीही पर्यटन व्यावसायिकांकडून करण्यात आली असून मागण्या आठ दिवसांत मान्य न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिला.

या आंदोलनात तारकर्ली पर्यटन संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर, पर्यटन व्यावसायिक अविनाश सामंत, नगरसेवक मंदार केणी, मनोज खोबरेकर, मिलिंद झाड, घनश्याम झाड, सूर्यकांत फणसेकर, सरदार ताजर, रवी तळाशिलकर आदी व इतर पर्यटन व्यावसायिक सहभागी झाले होते. मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर व जिल्हा मद्य संघटनेचे अध्यक्ष शेखर गाड यांनी आंदोलन ठिकाणी उपस्थित राहून पर्यटन व्यावसायिकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी मोंडकर यांनी वीज अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Web Title: Electricity bill flag movement, tourism business aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.