शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कलमठ येथे विद्युतभारीत वीजवाहिनी तुटली, वाहनाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 13:29 IST

कणकवली ते आचरा रस्त्यावरील कलमठ मच्छिमार्केटच्या बाजूला मुलांच्या वसतीगृहासमोर विद्युतभारीत वीजवाहिनी अचानक तुटून खाली पडली.

ठळक मुद्देकलमठ येथे विद्युतभारीत वीजवाहिनी तुटली, वाहनाचे नुकसानविजेची उपकरणे जळाली; सुदैवाने जीवितहानी टळली; ग्रामस्थ आक्रमक

कणकवली : कणकवली ते आचरा रस्त्यावरील कलमठ मच्छिमार्केटच्या बाजूला मुलांच्या वसतीगृहासमोर विद्युतभारीत वीजवाहिनी अचानक तुटून खाली पडली.

तिथे उभी करून ठेवलेल्या चारचाकी गाडीवर ही वाहिनी पडल्याने गाडीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. तर अचानक वीज भारमान वाढल्याने आजुबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांची तसेच व्यावसायिकांची विजेवर चालणारी उपकरणे जळाली आहेत. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली.दरम्यान, ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी वायरमनशी संपर्क साधला असता त्याने उद्धट उत्तरे दिली . त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी कणकवली येथील वीज वितरणचे विभागीय कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

आचरा रस्त्यावरील कलमठ ते वरवडे दरम्यानच्या वीजवाहिन्या जीर्ण झाल्या असून त्या बदलाव्यात अशी मागणी वारंवार कलमठ तसेच वरवडे ग्रामस्थ करीत होते. मात्र, वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.त्यामुळे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा फटका ग्रामस्थांना बसला.कणकवली-आचरा मुख्य मार्गावरील कलमठ मच्छिमार्केटच्या बाजूला मुलांच्या वसतिगृहासमोर विद्युतभारीत वीजवाहिनी अचानक तुटून तिथे उभी करून ठेवलेल्या गाडी (क्रमांक एम एच ०७ - ए .जे . ११५२) वर पडली. छोटा हत्तीसारख्या या चारचाकी गाडीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. तर आबा गुडेकर यांच्या गॅरेजमधील कॉम्प्रेसर व आॅलविन फर्नाडिस यांची वेल्डिंग मशीन जळाली आहे.

कलमठ बाजारपेठमधील दुकानदारांचेही नुकसान झाले आहे. घटना घडल्यानंतर वायरमन राकेश कुबल यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ग्रामस्थांना उद्धट उत्तरे दिली. त्यामुळे कलमठ, वरवडे येथील ग्रामस्थ आक्रमक होत वीज वितरणाच्या कणकवली येथील कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगत यांची भेट घेतली. यावेळी कार्यकारी अभियंता संजय गवळी तसेच शाखा अभियंता कानडे अनुपस्थित होते.कलमठ, वरवडे येथील ग्रामस्थानी वारंवार जीर्ण विजवाहिनी बदलाची मागणी केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही घटना घडली आहे, असा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. तसेच शाखा अभियंता कानडे यांच्या बदलीची मागणीही केली.

नुकसान झालेल्यांना भरपाई द्यावी अशी मागणी अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगत यांच्याकडे केली. त्यांनी कार्यकारी अभियंता संजय गवळी यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. त्यानंतर भगत यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने ग्रामस्थ शांत झाले.

यावेळी स्वाभिमान पक्ष युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, हनुमंत बोंद्रे, सुशांत राऊळ, नितीन पेडणेकर, आबा गुडेकर, आॅलविन फर्नांडिस, बाबा पारकर, पपू सावंत, अभि करंबेळकर, तोहसीन शेख, नंदू कोरगावकर उपस्थित होते. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग