शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीतील ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 13:31 IST

grampanchyat, elecation, sindhudurg, sawantwadi कोरोना कालावधीत लॉकडाऊनमुळे लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल आता वाजणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या व लोकसंख्येने मोठ्या असलेल्या अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसावंतवाडीतील ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता बिगुल वाजणार : कोरोनामुळे होत्या स्थगित, मतदार यादीचे काम सुरू

सावंतवाडी : कोरोना कालावधीत लॉकडाऊनमुळे लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल आता वाजणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या व लोकसंख्येने मोठ्या असलेल्या अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे.तालुका निवडणूक अधिकारी यांनी याबाबत माहिती दिली असून सर्वच राजकीय पक्षांनी या गावांकडे लक्ष वळविले आहे. तालुक्यातील या अकरा ग्रामपंचायतींपैकी निम्म्या ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता होती. आता शिवसेना महाविकास आघाडी व भाजप अशी लढत रंगणार आहे. कोरोनामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. मात्र, आता हळूहळू सर्व व्यवहार सुरू होत असल्याने जिल्हा निवडणूक विभागाने लॉकडाऊन काळात रखडलेल्या जिल्ह्यातील ६७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेच्या हालचाली सुरू केल्या आहेत.सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकप्रश्नी शुक्रवारी तहसील कार्यालयात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत झाली. मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणूक दिवाळीनंतर जाहीर होणार आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका होतील, अशी अपेक्षा आहे.सावंतवाडी मतदारसंघातील १६ ग्रामपंचायतीविधानसभा मतदारसंघात सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला अशा एकूण सोळा ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. सावंतवाडी तालुक्यात इन्सुली, आरोस, मळगाव, आरोंदा, तळवणे, मळेवाड, आंबोली, चौकुळ, दांडेली, कोलगाव, डिंगणे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर दोडामार्ग तालुक्यातील आयनोडे हेवाळे, तेरवणमेढे, कुडासे तर वेंगुर्ला तालुक्यात आरवली व सागरतीर्थ या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या ग्रामपंचायतींचा कालावधी ऑगस्टमध्ये संपला होता. त्यानंतर या ग्रामपंचायतीने प्रशासक नियुक्त केले आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकsindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी