शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: घराजवळ पडलेल्या वीज तारेच्या स्पर्शाने वृध्दा ठार, वाचवायला गेलेला नातू जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:18 IST

चौकशीचे आदेश

साखरपा : घराजवळ पडलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथे घडली आहे. हृदया शांताराम मोरे (७०, रा. जाधववाडी) असे त्यांचे नाव आहे. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचा २० वर्षांचा नातू ओम प्रकाश मोरे जखमी झाला आहे.हृदया मोरे या गुरुवारी पहाटे घराबाहेर काम करीत असताना घराजवळ पडलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने त्यांना शॉक लागला. यावेळी त्यांचा नातू ओम जवळच होता. त्याने आजीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही शॉक लागला. त्यात तो जखमी झाला.त्याचा आवाज ऐकून त्याचे वडील प्रकाश मोरे व गणेश मोरे यांनी दोघांनाही विजेच्या तारेपासून बाजूला करुन प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तोपर्यंत हृदया मोरे यांची प्राणज्योत मालवली होती. ओमवर प्राथमिक उपचार करून त्याला रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच साखरपा सरपंच रुचिता जाधव, उपसरपंच शशिकांत गुरव, ओंकार कोलते यांनी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली व जखमी ओम मोरे याला तातडीची मदत मिळावी, यासाठी प्रयत्न केले.चौकशीचे आदेशया घटनेची माहिती मिळताच आमदार किरण सामंत यांनी त्याची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. साखरपा पोलिस दूरक्षेत्राच्या साहाय्यक पोलिस निरीक्षक शबनम मुजावर, हेड कॉन्स्टेबल गणेश सुतार, कॉन्स्टेबल सुहास लाड यांनी घटनास्थळी जाऊन कार्यवाही सुरू केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गelectricityवीजDeathमृत्यू