शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

'शिक्षण आपल्या दारी' उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 13:06 IST

कोरोना व्हायरसचा फटका विविध क्षेत्रांना बसत आहे. त्यात शिक्षण क्षेत्राचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये विद्यार्थी येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कणकवली पंचायत समितीने ' शिक्षण आपल्या दारी ' हा सर्वसमावेशक उपक्रम हाती घेतला आहे. तालुक्यातील ७,५०० विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घरबसल्या घेत असून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे.

ठळक मुद्दे'शिक्षण आपल्या दारी' उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक !कणकवली पंचायत समितीचा उपक्रम ; ७५०० विद्यार्थ्यांना फायदा

सुधीर राणे

कणकवली  : कोरोना व्हायरसचा फटका विविध क्षेत्रांना बसत आहे. त्यात शिक्षण क्षेत्राचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये विद्यार्थी येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कणकवली पंचायत समितीने ' शिक्षण आपल्या दारी ' हा सर्वसमावेशक उपक्रम हाती घेतला आहे. तालुक्यातील ७,५०० विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घरबसल्या घेत असून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे.कोरोनामुळे शाळांचे शैक्षणिक कामकाज थांबले आहे . शहरी भागातील काही शैक्षणिक संस्थांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे . मात्र , ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कसे टाळता येईल ? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणारा विद्यार्थी हा सर्वसामान्य कुटुंबातील असतो. त्यामुळे या मुलांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचविणे शक्य नव्हते . ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध होत नाही. तर अनेक मुलांकडे अँड्रॉईड मोबाईल संच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार हे निश्चित होते .त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून ' शिक्षण आपल्या दारी ' हा अभिनव उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले .

या उपक्रमामधून ऑफलाईन पध्दतीने दर आठवड्याला विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांनी लेखी प्रश्नसंच पोहोचवायचे. तसेच पूर्वी दिलेले प्रश्नसंच संकलित करून त्याचे परीक्षण करायचे असे ठरले. त्याप्रमाणे या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली . कणकवली तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांनी सहकार्य केल्याने ६५० शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले . त्यांनी घरोघरी जात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या उपक्रमासाठी पंचायत समिती सेस फंडातून शैक्षणिक निधी घेण्याचे ठरविण्यात आले . तसा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत मांडल्यानंतर सर्वानुमते त्याला मंजुरी मिळाली . याउपक्रमासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक आणि शिक्षक असे सर्वजण कामाला लागले . शिक्षकांकडून स्वाध्याय कार्ड वितरित व संकलित करण्याबरोबरच केंद्रप्रमुख , शिक्षणविस्तार अधिकारी सुध्दा विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचत स्वाध्याय कार्डची तपासणी करत आहेत.कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहून पालक चिंतेत होते . अशा परिस्थितीत ' शिक्षण आपल्या दारी ' या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना फायदा झाला. शिक्षकांच्या माध्यमातून प्रश्नसंच घरी येत असल्याने व त्यातील न समजणारे विषय मुले विचारत असल्याने पालकांचाही सहभाग या उपक्रमात वाढू लागला आहे.

एरव्ही शाळेमध्ये काय शिकविले जाते याची सहसा दखल न घेणाऱ्या पालकांना घरी त्यांचीच मुले अभ्यासक्रमावरून प्रश्न विचारू लागली आहेत. त्यामुळे घरामध्ये शैक्षणिक संवाद होऊ लागला. हे या उपक्रमाचे मोठे फलित आहे .पंचायत समितीकडून दर आठवड्याला या उपक्रमासाठी सुमारे ११ हजारांचा निधी खर्च केला जातो . सेस फंडाचा निधी संपल्याने आता विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमासाठी ठेवलेला निधी या कामासाठी खर्च केला जाणार आहे . ' शिक्षण आपल्या दारी ' उपक्रमात सहभागी होताना तालुक्यातील शिक्षकांनी मोठे योगदान दिले आहे .

कणकवली तालुक्यातील विविध चेकपोस्टवर कोविड ड्युटी करताना , गावागावातील शाळामध्ये संस्था विलगीकरण झालेल्या चाकरमान्यांकडे लक्ष देण्याचे काम शिक्षक करत होते . हे करत असताना या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही , याची खबरदारीही तालुक्यातील शिक्षकांनी घेतली आहे. त्यांचे हे काम वाखाणण्याजोगे आहे.यापुढेही उपक्रम सुरूच राहणार !तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचणे शिक्षक , त्यांचे कुटुंबीय तसेच विद्यार्थी व पालकांसाठी त्रासदायक आहे. त्यामुळे येत्या काळात ' शिक्षण आपल्या दारी' हा उपक्रम पीडीएफ प्रश्नसंच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून सुरू ठेवला जाणार आहे . असे गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत सांगण्यात आले.विद्यार्थ्यांना चांगला शैक्षणिक फायदा !कणकवली तालुक्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या २२२ शाळांमधील विद्यार्थ्यांना आतापर्यंत ८ स्वाध्याय कार्ड देण्यात आले आहेत . तर या माध्यमातून ऑगस्टपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला आहे . त्यामुळे 'शिक्षण आपल्या दारी' या उपक्रमाचा चांगला फायदा तालुक्यातील विद्यार्थ्यांना झाला आहे. या उपक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो . असे सभापती दिलीप तळेकर म्हणाले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग