शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

अनाथ कन्येला संस्थेचे शिक्षणाचे पंख

By admin | Updated: September 6, 2015 22:35 IST

वात्सल्याचे छत्र : सनदी अधिकारी होण्याकडे ‘मधूर’ प्रवास

शोभना कांबळे - रत्नागिरी  दोनवेळा ‘पोरकी’ होण्याचा शाप भोगत असतानाच संस्थेने दिलेल्या मायेच्या छत्रामुळे शिक्षणाचे पंख लाभले आणि अनाथ असलेल्या ‘मधुरा’ची वाटचाल उच्च शिक्षणाच्या दिशेने सुरू झाली. त्यामुळे आता ‘एम. एस. डब्ल्यू.’ला प्रवेश घेतलेली मधुरा आता सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरारी घेऊ लागली आहे. मधुरा जन्मल्यानंतर मुंबईतील वात्सल्य मंदिरात वाढली. हे बालगृहच तिचे सर्वस्व होते. सातव्या वर्षी तिला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाटकर दाम्पत्याच्या रूपाने माता-पित्यांचे छत्र लाभले. चिमुकली मधुरा आई-बाबा मिळताच हरखून गेली. मात्र, नियतीला तिचे हे सुख बघवले नाही आणि ती बारा वर्षांची असतानाच मातृछत्र हरपले. त्यानंतर दोन वर्षांनी वडिलांचेही निधन झाले. ती दुसऱ्यांदा अनाथ झाली. तिला लांजा येथील बालगृहात दाखल करण्यात आले. तिचे आठवीपासूनचे शिक्षण पुढे सुरू झाले. मधुरा जात्याच हुशार असल्याने तिने मन लावून अभ्यास केला आणि दहावीत ६० टक्के, तर बारावीत कला शाखेत ६८ टक्के गुण मिळवले. पुढच्या शिक्षणासाठी तिला गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्यामुळे रत्नागिरीतील प्रतिभा शासकीय महिला वसतिगृहात ती दाखल झाली. या संस्थेत खऱ्या अर्थाने मधुराचा ‘मधूर’ प्रवास सुरू झाला. संस्थेच्या अधीक्षिका मंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मधुराचा सर्वांगीण विकास सुरू झाला. महाविद्यालयाच्या एन. एस. एस. विभागाच्या प्रा. डॉ. चित्रा गोस्वामी आणि त्यांचे सहकारी यांनीही या हिऱ्याची पारख करून त्याला पैलू पाडण्यास सुरुवात केली. यातूनच तिच्या लेखनाला प्रोत्साहन मिळाले. कॉलेजच्या सहकार अंकामध्ये तिचे लेख प्रसिद्ध होऊ लागले. अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्येही तिने वर्चस्व निर्माण केले. मधुराचे कॉलेज सकाळचे असल्याने दुपारनंतरच्या मोकळ्या वेळात तिने शॉर्टहँड, फॅशन डिझायनिंग, कराटे यांचेही प्रशिक्षण पूर्ण केले. हा प्रवास तिचा अतिशय वेगाने झाला. तिच्या या हुशारीमुळे, धडपड्या वृत्तीमुळे ती संस्थेप्रमाणे आपल्या शिक्षकांचीही लाडकी झाली. त्यांचे सहकार्य तिला पावलोपावली मिळू लागले. या साऱ्यांच्या प्रेरणेने मे २०१५ मध्ये मधुरा चक्क ६६ टक्के गुणांनी बी. ए. उत्तीर्ण झाली. या आनंदाबरोबरच तिच्या आयुष्यात अतिशय आनंदाचा क्षण म्हणजे तिला तिच्या आत्येनेच माता - पित्याचे छत्र दिले आहे. त्यामुळे ती आता आत्येच्या प्रेमळ छायेखाली आयुष्याचा पुढचा प्रवास करत आहे. आजवरच्या प्रवासात आलेल्या अनुभवामुळे मधुराला अनाथ मुलांसाठी काम करण्याची तीव्र इच्छा आहे. त्यामुळे तिला सनदी अधिकारी बनायचे आहे. यासाठी कितीही परिश्रम करावे लागले तरी तिची तयारी आहे. मधुरा आता पणजी येथील विद्यापीठात एम. एस. डब्ल्यू करतेय. त्याचबरोबर कणकवली येथील नेहरू युवा केंद्रात तालुका समन्वयक म्हणूनही काम करतेय. ती तिथे असली तरी तिची पावले ज्या संस्थेने तिला हा सारा आनंद मिळवून दिला, त्या प्रतिभा शासकीय महिला वसतिगृहाकडे, पाटील मॅडमना, गोस्वामी मॅडमना भेटण्यासाठी आपसूक वळतात. तिचा काळाकुट्ट भूतकाळ केव्हाच नष्ट झाला आहे.मला संस्थेने प्रेम आणि आत्मविश्वास दिला. संस्था नसती तर मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते. गोस्वामी मॅडम, पाटील मॅडम यांच्यामुळेच माझ्या जीवनात आता आनंद आला आहे. अनाथ मुलांसाठी, महिलांसाठी मला काहीतरी करायचय. आयएएस अधिकारी होण्याचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी मी एमपीएससी परीक्षेचीही तयारी करतेय.- मधुरा पाटकरसंस्थेत आल्यानंतर मधुरा विविध स्पर्धांमध्ये यश मिळवीत गेली. १ मे, १५ आॅगस्ट, २६ जानेवारी या दिवशी तिचा मुद्दाम सत्कार करायचे, यातून इतर मुलींनाही प्रेरणा मिळत गेली. संस्थेत आलेल्या मुलींना पुढे काय करायचे, हे कळत नाही. पण या मुलींची आवड लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन केले, तर त्या नक्कीच त्याचे चीज करतात, याचे उत्तम उदाहरण मधुरा आहे. अशा कित्येक मुली आहेत.- मंदा पाटील,अधीक्षीका येथील जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी जावेद शेख यांची बदली झाली असून, त्यांचा तात्पुरता कार्यभार सिंधुदुर्गचे यु. एस. भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे. मधुराबाबत मंदा पाटील यांनी त्यांना माहिती देताच त्यांनी मधुराला बोलावले, तिचे कौतुक केले आणि तिला सांगितले, तुझे टायपिंग पूर्ण झाले की सांग. मी तुला नक्कीच नोकरी मिळवून देईन. त्यामुळे मधुराला खूप धीर आला आहे.