शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण समिती सभा, रिक्त पदे तत्काळ न भरल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 20:08 IST

Zp, Education Sector, sindhudurg सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिक्त पदांमुळे शाळा कशा चालवायच्या आणि दर्जेदार शिक्षण कसे द्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी शासनाने सर्व रिक्त पदे तत्काळ भरावीत असा ठराव शिक्षण समिती सभेत घेण्यात आला तर रिक्त पदे तत्काळ न भरल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा सदस्य विष्णूदास कुबल यांनी सभेत दिला.

ठळक मुद्देशिक्षण समिती सभा, रिक्त पदे तत्काळ न भरल्यास आंदोलनरिक्त पदांमुळे शाळा चालवायच्या कशा? : विष्णूदास कुबल

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रप्रमुख, पदवीधर आणि उपशिक्षकांची अशी मिळून ५०० हून अधिक पदे रिक्त आहेत याचा अध्यापनावर मोठा परिणाम होत आहे. रिक्त पदांमुळे शाळा कशा चालवायच्या आणि दर्जेदार शिक्षण कसे द्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी शासनाने सर्व रिक्त पदे तत्काळ भरावीत असा ठराव शिक्षण समिती सभेत घेण्यात आला तर रिक्त पदे तत्काळ न भरल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा सदस्य विष्णूदास कुबल यांनी सभेत दिला.सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज समिती सभागृहात सोमवारी झाली. यावेळी समिती सचिव तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, विष्णूदास कुबल, सरोज परब, संपदा देसाई, राजन मुळीक आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते .शिक्षण समितीमध्ये रिक्त पदांचा आढावा घेतला असता केंद्रप्रमुख ४८ पदे, पदवीधर शिक्षक २७२ पदे तर उपशिक्षकांची २८८ पदे रिक्त असल्याची माहिती सभेत देण्यात आली. ही रिक्त पदे भरण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त नसल्याची माहिती सभेत देण्यात आली.

यावर चर्चा होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रप्रमुख पदवीधर व शिक्षकांची महत्त्वाची पाचशेहून अधिक पदे रिक्त असताना येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळणार? शाळा कशा सुरू ठेवायच्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी शासनाने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्यादृष्टीने तत्काळ ही पदे भरावीत असा ठराव शिक्षण समिती सभेत घेण्यात आला. तर शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत तत्काळ कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा सदस्य विष्णूदास कुबल यांनी सभेत दिला.शिक्षणाधिकाऱ्यांचा वेळ घेऊनच सभा आयोजित करामाध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या संदर्भात गेल्या दोन-तीन बैठकांना विविध प्रश्न उपस्थित होत असताना माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस सभांना उपस्थित राहत नाहीत याबद्दल सभेत सदस्य दादा कुबल आणि संपदा देसाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच सदस्यांचे प्रश्न टाळण्यासाठी ते सभांना गैरहजर राहत असल्याचा आरोप केला.

यावर प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यानी ते मेडिकल रजेवर असल्याचे सांगितले. तरी यापुढे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची मोकळी वेळ घेऊनच आणि फिटनेस दाखला घेऊनच सभेचे आयोजन करा अशी सूचना सदस्या संपदा देसाई यांनी सभेत मांडली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग