शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्लेतील सुरुचे बन, बीच परिसरातील झाडांची कत्तल, तहसीलदारांकडे तक्रार : वृक्षतोडीचा महसूलकडून पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 13:43 IST

वेंगुर्ले तालुक्यात सुरुचे बन व बीच असलेल्या सागरेश्वर मंदिरालगतच्या ३० वर्षांच्या ४० ते ५० फूट उंचीच्या सुमारे ३० झाडांची कत्तल मंगळवारी व बुधवारी करण्यात आली. या तोडीबाबत स्थानिक उभादांडा ग्रामपंचायतीकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी वेंगुर्ले तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार महसूल विभागामार्फत पंचनामा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या बांधकाम विभागाच्या अहवालानुसार परवानगी वृक्षतोड शासकीय परवानगीनेच : संजय कल्पेइंडोनेशिया कॉटेजला सीआरझेडचीही परवानगी

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यात सुरुचे बन व बीच असलेल्या सागरेश्वर मंदिरालगतच्या ३० वर्षांच्या ४० ते ५० फूट उंचीच्या सुमारे ३० झाडांची कत्तल मंगळवारी व बुधवारी करण्यात आली. या तोडीबाबत स्थानिक उभादांडा ग्रामपंचायतीकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी वेंगुर्ले तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार महसूल विभागामार्फत पंचनामा करण्यात आला आहे.

शासन दरवर्षी एक कोटी वृक्ष लागवड करते. वृक्षसंवर्धनासाठी राष्ट्रीय स्तरावर अभियान हाती घेण्यात आले असताना समुद्र्र किनाऱ्याला लागून असलेल्या आणि सामाजिक वनीकरण विभागाने लागवड केलेल्या सुरुच्या झाडांची कत्तल करणे संतापजनक असल्याची प्रतिक्रिया भाजपचे तालुका उपाध्यक्ष चिंतामणी धुरी यांनी व्यक्त केली आहे. 

या वृक्षतोडीबाबत उभादांडा ग्रामपंचायत, वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय किंवा अन्य शासकीय स्थानिक कार्यालयांना माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांतून शासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तलाठ्यांनी घटनास्थळी पंचयादी घातली. त्यावर ग्रामस्थ चिंतामणी धुरी, रत्नाकर वराडकर, मधुसूदन तिरोडकर, शंकर माने यांनी सह्या केल्या आहेत.

उभादांडा सागरेश्वर मंदिर येथील सर्व्हे नं. ४७ मधील असलेल्या सुरुच्या बनातील अवैध वृक्षतोड करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. अन्यथा आंदोलन करावे लागेल, अशा इशारा उभादांडा परिसरातील चिंतामणी धुरींसह ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर रत्नाकर वराडकर, प्रदीप परुळेकर, विजय सांडये, मधुकर तिरोडकर, आंद्रू फर्नांडिस, जयवंत दीपनाईक यांच्यासह २८ जणांच्या सह्या आहेत.

वृक्षतोड शासकीय परवानगीनेच : संजय कल्पेवेंगुर्ले सागरेश्वर बीच येथील सुरुच्या झाडांची तोड तेथे स्वदेश भ्रमण अंतर्गत होणाऱ्या इंडोनेशिया कॉटेज प्रकल्पासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मंडळाच्या बांधकाम विभागाच्या अहवालानुसार शासनाची परवानगी घेऊन केल्याची माहिती एमआयडीसीचे सिंधुदुर्ग-रत्नागिरी विभागाचे संजय कल्पे यांनी दिली.

इंडोनेशिया कॉटेजला सीआरझेडची परवानगीही शासनाने दिली आहे. झाडे तोडण्यासंदर्भात निविदा वा त्या झाडांचा लिलाव याबाबत वरिष्ठ स्तरावरुन प्रक्रिया झालेली आहे. त्यामुळे हा झाडांची गैरतोड वा चोरीचा विषय नाही, असे कल्पे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनारा